Home मनोरंजन नवीन मालिकेत शेफाली शर्मा, काम्या पंजाबी, रजनीश दुग्गल आणि रजत दाहिया

नवीन मालिकेत शेफाली शर्मा, काम्या पंजाबी, रजनीश दुग्गल आणि रजत दाहिया

0 second read
0
0
125

no images were found

‘झी टीव्ही’वर प्रसारित होणाऱ्या मालिकेत शेफाली शर्मा,
काम्या पंजाबी, रजनीश दुग्गल आणि रजत दाहिया
मुंबई : गेल्या तीन दशकांत ‘झी टीव्ही’ वाहिनीने प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या मालिका आणि त्यात प्रेमात पडावीत अशा व्यक्तिरेखा सादर केल्या आहेत. भारताच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांना भावतील अशा अनेक सुंदर कथा सादर केल्यानंतर ‘झी टीव्ही’ आणि ‘रश्मी शर्मा टेलिफिल्म्स’ पुन्हा एकदा एकत्र आले असून त्यांनी निर्मिलेली ‘संजोग’ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांपुढे सादर केली जाईल. जोधपूरमध्ये घडणाऱ्या या मालिकेत शेफाली शर्मा आणि काम्या पंजाबी या नामवंत अभिनेत्री अनुक्रमे अमृता आणि गौरी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. त्यांच्या तारा आणि चंदा या मुलींच्या भूमिकेत अनुक्रमे उगवत्या अभिनेत्री हेझल शहा आणि हेतवी शर्मा या आहेत. दुसरीकडे मॉडेलिंगकडून अभिनयाकडे वळलेला कलाकार रजनीश दुग्गल आणि रजत दाहिया हे दोघे अनुक्रमे राजीव कोठारी (अमृताचा पती) आणि गोपाळ (गौरीचा पती) या व्यक्तिरेखा रंगविणार आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …