Home शैक्षणिक संगीत आणि नाट्यशास्त्र विभागात ‘स्वररंग’ संपन्न

संगीत आणि नाट्यशास्त्र विभागात ‘स्वररंग’ संपन्न

0 second read
0
0
45

no images were found

संगीत आणि नाट्यशास्त्र विभागात ‘स्वररंग’ संपन्न
 

शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागातर्फे विभागातील विद्यार्थी व पालकांसाठी ‘स्वररंग’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बहारदार झालेल्या या कार्यक्रमामध्ये विभागातील विद्यार्थ्यांनी उपशास्त्रिय, सुगम गीतप्रकार, रामायणातील प्रसंगावर आधारित भरतनाट्यम नृत्य, एकल तबलावादन इत्यादींचे बहारदार सादरीकरण केले. या सर्व कार्यक्रमाला विभागातील शिक्षक सौ. गौरी कुलकर्णी व विद्यार्थी रोहन लाखे यांनी हार्मोनिअमची साथ केली तर तबल्याची साथसंगत श्री. संदेश गावंदे, विक्रम परिट तसेच सौरभ सनदी या शिक्षक साथीदारांनी केली. या
संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना व सादरीकरणास विभागप्रमुख अंजली निगवेकर, सहाय्यक प्राध्यापक डॉ.विनोद ठाकूरदेसाई, निखील भगत तसेच सौ. पदमश्री बागडेकर, शिवानी ढेरे, गौरी कुलकर्णी तसेच श्री. अतुल परीट यांचे मार्गदर्शन लाभले. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात झालेल्या या छोटेखानी बहारदार कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…