no images were found
नाशिकमध्ये कांदा, द्राक्ष रस्त्यावर फेकून स्वाभिमानीचे आंदोलन
नाशिक : शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीनं राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं जात आहे. नाशिक जिल्ह्यात या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील वणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिर्डी-सुरत महामार्गावर – आंदोलन सुरु केलं आहे. यावेळी शेतकऱ्यांनी कांदे द्राक्ष रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला.
स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वाताखाली वणी येथे आंदोलन सुरु आहे. सरकारला जर लोकशाही मार्गाची भाषा समजत नसेल तर अधिवेशनादरम्यान विधानभवनावर कांदे, द्राक्ष आणि जिल्हा बँकेच्या नोटीसा फेकू असा इशारा संदीप जगताप यांनी दिला. स्वाभिमानीच्या कार्यकर्ते सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. सरकारने शेतीमालाच्या दरासंदर्भात चुकीची धोरण अवलंबल्याची टीका आंदोलकांनी केली. संपूर्ण महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. वणी मध्ये सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रस्ता रोको केल्याची माहिती स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली. सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. सध्या सोयाबीन, कापूस आणि कांद्याचे दर घसरल्यामुळं आंदोलन सुरु आहे.