no images were found
रत्नाप्पा कुंभार पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेंद्र गायकवाड तर उपाध्यक्षपदी सौ. अरुणा गडगे
कोल्हापूर : येथील श्री रत्नाप्पा कुंभार नगर नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेंद्र रामचंद्र गायकवाड, तर उपाध्यक्षपदी सौ. अरुणा गजेंद्र गडगे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी बी. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २०२३-२८ या सालासाठी संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संचालकपदी विजय बापूसाहेब आडनाईक, दादू दत्तात्रय कुंभार, प्रकाश वासुदेव महाजन, मनोहर रंगराव पाटील, आयाज बाबालाल डांगे, विष्णू खंडू डवरी, गिरीश नामदेवराव बुवा, संदीप सदाशिव मगदूम, सौ. हेमलता संजय टेंबुर्ले यांच्यासह राजेंद्र रामचंद्र गायकवाड, सौ. अरुणा गजेंद्र गडगे यांची निवड केली. यामधून श्री. गायकवाड व सौ. गडगे अध्यक्ष-उपाध्यक्षपदी निवडले गेले. यावेळी सचिव अनिल आप्पासाहेब शिरगावे व क्लार्क संकेत मधुकर सावंत आदी उपस्थित होते.