Home स्पोर्ट्स आज खासबागेत जंगी निकाली कुस्त्यांचे मैदान

आज खासबागेत जंगी निकाली कुस्त्यांचे मैदान

0 second read
0
0
145

no images were found

आज खासबागेत जंगी निकाली कुस्त्यांचे मैदान

कोल्हापूर : कोरोना प्रदुर्भावानंतर भरपूर कालावधीनंतर कोल्हापुरात बेमुदत निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे. कोल्हापूरमधील कुस्तीप्रेमींसाठी ही मेजवानीच आहे. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए) चे चिफ पेट्रन शाहू छत्रपती महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने हे कुस्ती मैदान होणार असून आज शनिवार (दि. ७ जानेवारी) दुपारी ३ वाजल्यापासून कुस्त्यांची सुरुवात होईल. मुख्य मोठ्या पाच कुस्त्यांसह १०७ कुस्त्यांसाठी तब्बल १५ लाख बक्षिसांची घोषणा माजी खा. संभाजीराजे व माजी आ. मालोजीराजे यांच्याकडून करण्यात आली आहे.

या कुस्ती स्पर्धेचा बक्षीस समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख खा. शरद पवार, पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार, आमदार यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने शाहू छत्रपती महाराज यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार चांदीची गदा देऊन करण्यात येणार आहे. स्पर्धांसाठी मैदानाची जय्यत तयारी कोल्हापूर महानगरपालिका व कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या जंगी निकाली कुस्त्यांत महाराष्ट्रासह कर्नाटक, पंजाब, दिल्ली येथून येणाऱ्या मल्लांचाही सहभाग असणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

व्हायरल ऑडिओ क्लिप व इतर गुन्ह्यांची सखोल चौकशी करून रविकिरण इंगवले यांच्यावर तात्काळ कारवाई करावी;

व्हायरल ऑडिओ क्लिप व इतर गुन्ह्यांची सखोल चौकशी करून रविकिरण इंगवले यांच्यावर तात्काळ कारव…