no images were found
पुलावरुन पेव्हर ब्लॉक कोसळल्याने वाहन चालकांत गोंधळ
मुंबई : जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर विक्रोळी गांधीनगर येथे उड्डाणपुलावरुन पेव्हर ब्लॉक कोसळल्याने वाहनचालकांत काहीकाळ संभ्रमावस्था निर्माण झाली. पूल कोसळला असेल असा गैरसमज निर्माण झाला त्यामुळे खळबळ माजली.
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर विक्रोळी गांधीनगर सिग्नलला दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास सिग्नल लागला म्हणून सर्व गाड्या उभ्या होत्या. वरून पेव्हर ब्लॉक दोन गाड्यांवर पडल्याने सर्व वाहनचालक पूल कोसळला असे समजून आपल्या गाड्या सोडून पळू लागले. परंतु यानंतर प्रत्यक्ष जवळ जाऊन पाहिले असता तो पेव्हर ब्लॉक असल्याचे लक्षात आल्यानंतर वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. आज दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. परंतु दोन्ही कारच्या काचा फुटून नुकसान झाले. थोड्याच वेळात वाहतूक सुरळीत करण्यात आली.