Home राजकीय उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आ. निलेश लंकेंची तब्येत खालावली

उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आ. निलेश लंकेंची तब्येत खालावली

0 second read
0
0
150

no images were found

उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आ. निलेश लंकेंची तब्येत खालावली

अहमदनगर : राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. आ. लंके यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मात्र असं असतानाही अधिकाऱ्यांकडून कुठलीही दखल घेतली जात नसून लोकप्रतिनिधीची ही अवस्था असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय, असा प्रश्न लंके यांनी उपस्थित केला आहे. यांची तब्येत काहीशी खालावली असून त्यांचं दोन किलो वजन कमी झालं आहे.
निलेश लंके आणि त्यांच्याबरोबर बसलेल्या उपोषणकर्त्यांची आज डॉक्टरने तपासणी केली. यावेळी आमदार निलेश लंके यांचं दोन किलो वजन कमी झाले आहे, मात्र त्यांच्या प्रकृतीबाबत काळजी करण्यासारखं काही नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. आ. निलेश लंके यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी नगर तालुक्यातील करंजी, टाकळी ढोकेश्वर, पारनेर चिचोंडी पाटील, आरणगाव या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून रस्ता रोको करण्यात आला आहे. लंके यांच्या मागणीबाबत लवकर तोडगा निघाला नाही तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आगामी काळात आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आमदार लंके यांच्या मातोश्री शकुंतला लंके यांनी आज उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. आंदोलनाची दखल घेतली नसल्याने तातडीने प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, असं मत आमदार निलेश लंके यांच्या मातोश्रींनी व्यक्त केली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…