no images were found
दारिद्रय रेषेखालील मुलींसाठी मोफत डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स कोर्स
जिल्ह्यातील पात्र दहावी उत्तीर्ण मुलींनी कोर्सचा लाभ घेण्याचे आवाहन
कोल्हापूर : राज्यातील रहिवासी असलेल्या १६ ते १९ वयोगटातील इयत्ता दहावी उत्तीर्ण दारिद्र्य रेषेखालील मुलींसाठी मोफत डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स हा २ वर्षाचा निवासी कोर्स मोफत शिकविला जाणार असल्याचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविलेआहे.
सिम्बायोसिस विद्यापीठ, पुणे आणि फियाट इंडिया ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड, रांजणगाव, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील रहिवासी असलेल्या १६ ते १९ वयोगटातील इयत्ता १० वी उत्तीर्ण दारिद्र्य रेषेखालील मुलींकरिता मोफत डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स हा २ वर्षाचा निवासी कोर्स मोफत शिकविला जाणार आहे. प्रवेशाकरिता चाळणी परीक्षा व मुलाखत घेण्यात येणार असून इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. यासाठी ३० जुलै ही अंतिम तारीख असून अधिक माहितीसाठी अमोल फातले ९६७३३३०४६८, आकांक्षा तिवारी ९३११४१००२४ यांच्याशी संपर्क साधावा.