सीडीएसएल आयपीएफतर्फे कोल्हापुरात गुंतवणूक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन; कोल्हापूर,(प्रतिनिधी):- समाजाच्या विविध गटांमध्ये वित्तीय जागरूकता वाढविण्यासाठी, ‘सीडीएसएल इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड’तर्फे (सीडीएसएल आयपीएफ) कोल्हापूर येथे अनेक ठिकाणी गुंतवणूक शिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले. हे कार्यक्रम शिवाजी विद्यापीठातील वायसीएसआरडी येथे, तसेच न्यू कॉलेजमधील रामेटी कृषी प्रशिक्षण केंद्रात आणि बड्स स्कूल येथे घेण्यात आला. यात विद्यार्थी, शिक्षक आणि शासकीय कर्मचारी यांचा समावेश असलेल्या विविध …