वरुण गांधी यांना अमेठीतून काँग्रेसची उमेदवारी? नवी दिल्ली : भाजपने वरुण गांधींना उत्तर प्रदेशातील पीलभीत मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यानंतर मंगळवारी काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांनी त्यांना काँग्रेस प्रवेशाचा सांगावा धाडला आहे. त्यामुळे वरुण गांधी अमेठीतून लोकसभा निवडणूक लढण्याबाबत तर्कवितर्क केला जात आहेत. भाजपच्या नेत्या मनेका गांधी यांना सुल्तानपूरमधून उमेदवारी दिल्यामुळे वरुण गांधी यांची राजकीय कोंडी झाल्याचे मानले जात आहे. पीलभीतमधून काँग्रेसचे …