
no images were found
गीत ध्वनीमुद्रणानं ‘सातारकरांची बुटे‘ मराठी चित्रपटाचा मुहूर्त…
मराठी चित्रपटांचा डंका सध्या जगभर वाजत आहे. देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांसोबतच पुरस्कार सोहळ्यांमध्येही मराठी चित्रपट बाजी मारत आहेत. नावीन्यपूर्ण आणि प्रयोगशील कथांच्या जोडीला लक्षवेधी शीर्षकांमुळे मराठी चित्रपट सर्व वयोगटांतील सिनेरसिकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहेत. याच वाटेवरील ईगल मोशन पिक्चर्सची प्रस्तुती असलेल्या ‘सातारकरांची बुटे’ या मराठी चित्रपटाची निर्मिती सतिश चंद्रकांत देसाई, शिवानी सतिश देसाई आणि कु. अदिती सतिश देसाई यांनी केली आहे. दिग्दर्शक राजेंद्र पवार यांच्या दिग्दर्शनाखाली ‘सातारकरांची बुटे’ हा चित्रपट तयार होणार आहे. काहीशा अनोख्या आणि विचार करायला लावणाऱ्या शीर्षकाच्या या मराठी चित्रपटाचा नुकताच गीत ध्वनीमुद्रणाने मुहूर्त करण्यात आला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना आजवर कधीही न पाहिलेलं कथानक आणि त्यातील विविध गोष्टी पहायला मिळणार आहेत.
अंधेरीतील ऑडिओ गॅरेज स्टुडिओमध्ये गीत ध्वनीमुद्रणानं ‘सातारकरांची बुटे’ चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार अश्विनी कासार, शशिकांत केरकर, निर्माते सतिश चंद्रकांत देसाई, शिवानी सतिश देसाई आणि कु. अदिती सतिश देसाई, दिग्दर्शक राजेंद्र पवार, गीतकार, संगीतकार वरुण लिखते, गायक ऋषिकेश रानडे, किर्ती किल्लेदार, हर्षवर्धन वावरे, वरुण लिखते,कार्यकरी निर्माते आहेत राजू कृष्णा झेंडे उपस्थित होते. यातील गाणी गीतकार मंदार चोळकर यांनी लिहिलं असून, संगीतकार वरुण लिखते यांनी संगीतबद्ध केली आहे. या चित्रपटात कथानकाच्या प्रवाहाशी एकरूप होणारी वेगवेगळ्या मूड्समधील दोन गाणी आहेत. यात ऋषिकेश रानडे, किर्ती किल्लेदार यांच्या रोमँटिक साँगसोबतच पार्टी साँगचाही समावेश आहे जे हर्षवर्धन वावरे, वरुण लिखाते यांच्या सुमधूर आवाजातील गाणी संगीतप्रेमींचं मनोरंजन करणार आहेत. ‘सातारकरांची बुटे’ संवादलेखन केलं आहे राजेंद्र पवार यांनीच. तर कार्यकरी निर्माते आहेत राजू कृष्णा झेंडे. या चित्रपटात अभिजीत आमकर, अश्विनी कासार, शशिकांत केरकर.अरुण नलावडे,विजय पाटकर,अंशुमन विचारे,मनीषा मोरे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. मुहूर्तानंतर लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रारंभ करण्याची योजना आखण्यात आली असून संपूर्ण महारा्ट्रातील नयनरम्य लोकेशन्स वर ह्या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे.