Home मनोरंजन मराठी मिडियम मालिकेतील मुख्य नायक अक्षय नलावडेच्या अभिनयाची अशी झाली सुरुवात

मराठी मिडियम मालिकेतील मुख्य नायक अक्षय नलावडेच्या अभिनयाची अशी झाली सुरुवात

4 second read
0
0
7

no images were found

मराठी मिडियम मालिकेतील मुख्य नायक अक्षय नलावडेच्या अभिनयाची अशी झाली सुरुवात

 स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या मराठी मिडियम या नव्या मालिकेत नवोदित अभिनेता अक्षय नलावडे मुख्य नायकाच्या भूमिकेत आहे. अक्षय नलावडेची मुख्य भूमिका असलेली मराठी मिडियम ही पहिली मालिका. आयुष्यातली पहिली मुख्य भूमिका, आवडतं चॅनेल, आवडते निर्माते आणि आवडते दिग्दर्शक असा छान योग जुळून आल्यामुळे अक्षयचा आनंद गगनात मावत नाहीय. या भूमिकेविषयी सांगताना अक्षय म्हणाला, ‘मी मालिकेत साकारत असलेला विक्रांत शिखरे अत्यंत महत्त्वाकांक्षी, आत्मविश्वासू आणि स्वतच्या विचारांवर ठाम असलेला आहे. तो यशस्वी उद्योजक आहे. त्याचं आयुष्य, त्याचे निर्णय आणि त्याचा दृष्टिकोन यात स्पष्टता असते. विक्रांतसाठी भावना महत्त्वाच्या आहेत, पण भावनांच्या आहारी जाऊन व्यवहार बाजूला ठेवला जाऊ शकत नाही यावर त्याचा ठाम विश्वास आहे. लग्न, प्रेम वैगेर गोष्टींकडे तो प्रॅक्टिकॅलिटीच्या चष्म्यातून बघतो. विक्रांत शिखरे या पात्राला आकार देण्यात आमचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांचा मोलाचा वाटा आहे. मंदार देवस्थळी यांनी विक्रांत या पात्राची मानसिकता, त्याची देहबोली, त्याची विचार करण्याची पद्धत यावर खूप बारकाईने काम केलं. मला हे पात्र साकारताना त्याची खूप मदत होतेय.’

अक्षय नलावडेचा अभिनय क्षेत्रातला प्रवास स्वप्नवत आहे. अक्षय उत्तम डान्सर देखिल आहे. सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक श्यामक दावर यांच्या डान्स कंपनीमध्ये तो बॅगराऊंड डान्सर म्हणून काम करायचा. त्यांच्याकडेच अक्षयने डान्समध्ये पदवी मिळवली. अक्षयच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी दिली ती एका हिंदी अ‍ॅक्टिंग रिअ‍ॅलिटी शोने. त्या शोमध्ये अक्षय उपविजेता ठरला आणि खऱ्या अर्थाने त्याची अभिनयाची सुरुवात झाली दोन हिंदी सिनेमांमध्ये छोटेखानी भूमिका साकारल्यानंतर अक्षयने मराठी मालिकांसाठी ऑडिशन द्यायला सुरुवात केली. मराठी मिडियम मालिकेसाठी ऑडिशन दिल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनंतर मुख्य नायकाच्या भूमिकेसाठी निवड झाल्याचा अक्षयला फोन आला आणि तो त्याच्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस ठरला. मराठी मिडियम मालिकेच्या रुपात मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची अक्षयची इच्छा आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

३१ ऑक्टोबरपर्यंत थकीत मुद्दल न भरल्यास ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा खंडित करणार आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांचा इशारा

३१ ऑक्टोबरपर्यंत थकीत मुद्दल न भरल्यास ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा खंडित करणार आयुक्त डॉ. र…