Home Uncategorized व्यवसाय परवाना न घेतल्याने राजारामपुरीतील मेहता पब्लिशिंग हाऊसचे दुकान सीलबंद

व्यवसाय परवाना न घेतल्याने राजारामपुरीतील मेहता पब्लिशिंग हाऊसचे दुकान सीलबंद

22 second read
0
0
9

no images were found

व्यवसाय परवाना न घेतल्याने राजारामपुरीतील मेहता पब्लिशिंग हाऊसचे दुकान सीलबंद

नोटीस देऊनही परवाना न घेतल्याने केली कारवाई

कोल्हापूर,  : कोल्हापूर महानगरपालिकेचा व्यवसाय परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवल्याने राजारामपुरी येथील मेहता पब्लिशिंग हाऊस प्रा. लि. यांचे दुकान आज महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागामार्फत सीलबंद करण्यात आले.

            राजारामपुरी येथील पाचव्या गल्लीतील जयश्री हाइट्स, शॉप क्रमांक १, सी. एस. क्रमांक १८४७ येथे मेहता पब्लिशिंग हाऊस प्रा. लि. यांचे दुकान आहे. या दुकानात व्यवसाय परवाना न घेता व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने महानगरपालिकेमार्फत संबंधितांना दि.३ ऑगस्ट २०२६ रोजी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, नोटीस देऊनही विहित मुदतीत व्यवसाय परवाना प्राप्त करून न घेतल्याने १३ ऑक्टोबर रोजी दुकान सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली.

            ही कारवाई महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या निर्देशानुसार व सहायक आयुक्त विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत उपद्रव शोध पथकासह कर अधीक्षक दत्तप्रसाद माजगावकर, कर सहायक अच्युत अडुरकर तसेच मदतनीस सनी सरनाईक व मलिक भोसले यांनी सहभाग घेतला.

            महानगरपालिकेचा व्यवसाय परवाना घेऊनच व्यवसाय सुरू करावा, तसेच परवान्याबाबतच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

सराफ व्यावसायिकांसाठी व्यवसाय परवाना शिबिराला प्रतिसाद : नवीन परवान्यासाठी १५ अर्ज दाखल ; २० परवान्यांचे नूतनीकरण

सराफ व्यावसायिकांसाठी व्यवसाय परवाना शिबिराला प्रतिसाद : नवीन परवान्यासाठी १५ अर्ज दा…