Home Uncategorized विभागीय कार्यालय स्तरावर नागरिकांच्या तक्रारी सोडवा; अतिक्रमणावर सातत्याने कारवाई करा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

विभागीय कार्यालय स्तरावर नागरिकांच्या तक्रारी सोडवा; अतिक्रमणावर सातत्याने कारवाई करा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

39 second read
0
0
17

no images were found

विभागीय कार्यालय स्तरावर नागरिकांच्या तक्रारी सोडवाअतिक्रमणावर सातत्याने कारवाई करा – आयुक्त डॉराजेंद्र भारुड

कोल्हापूर, : नागरिकांना प्रत्येक प्रश्नासाठी आयुक्त कार्यालयापर्यंत येण्याची वेळ येता कामा नये. विभागीय कार्यालय स्तरावरच नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण झाले पाहिजे. तसेच महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अधिकृत हातगाड्यांसाठी विभागीय कार्यालय स्तरावर कॅम्प घेऊन नियमानुसार क्यूआर कोड देण्यात यावेत. ज्या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली आहे, त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी सर्व सहाय्यक आयुक्त व उपशहर अभियंत्यांना दिल्या. महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयात आयोजित विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड बोलत होते. यावेळी शहरातील पाणीपुरवठा, करवसुली, अतिक्रमण निर्मूलन, शिक्षण, उद्याने विभागाच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

            अनधिकृत पाणी जोडण्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकामार्फत सातत्याने कारवाई सुरू ठेवावी. पथकाने आपल्या कार्यक्षेत्रासह संलग्न उपनगरांमध्येही अनधिकृत पाणी जोडण्यांचा शोध घेऊन नियमानुसार कारवाई करावी असे निर्देश दिले. शहरातील पार्किंग व्यवस्था सुधारण्याबरोबरच अनधिकृत हातगाड्या व केबिन्सविरोधातील कारवाई सातत्याने सुरू ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. रेल्वे स्टेशन परिसरातील मल्टीलेव्हल कार पार्किंगची निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सदर पार्किंग त्याच कंपनीमार्फत सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील रस्त्यांची तातडीने डागडुजी करून ते वाहतुकीस योग्य करावेत. वॉरंटी कालावधीत असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती संबंधित ठेकेदारांकडून करून घ्यावी. तसेच शहरातील सर्व रस्त्यांची तपासणी करून त्यांचे ऑडिट करून घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. डांबरी रस्त्यांची कामे करणाऱ्या सर्व ठेकेदारांची गुरुवारी बैठक घेण्यात यावी असे निर्देश शहर अभियंत्यांना देण्यात आले. शहरात कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये वाढ झाली असून सर्व सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या नियंत्रणाखालील क्षेत्रातील अशा मालमत्तांचा एकात्मिक करप्रणालीद्वारे शोध घेऊन नियमानुसार कर आकारणी व वसुली करण्याच्या सूचना दिल्या.

            बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉ. विजय पाटील, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, नगरसचिव दिवाकर कारंडे, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, उपशहर रचनाकार महादेव फुलारी, उपशहर अभियंता सुरेश पाटील, निवास पोवार, अरुणकुमार गवळी, सहाय्यक अभियंता नारायण पुजारी, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, रवका अधिकारी प्रशांत पंडत, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंह रजपूत, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे आदी उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

तृतीयपंथी कल्याण, हक्क व संरक्षण कायदा’ विषयावर गुरूवारी कार्यशाळा

‘तृतीयपंथी कल्याण, हक्क व संरक्षण कायदा’ विषयावर गुरूवारी कार्यशाळा कोल्हापूर, : महाराष्ट्…