Home Uncategorized शहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण कर -जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

शहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण कर -जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

9 second read
0
0
5

no images were found

शहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण कर -जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

    कोल्हापूर  : कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिकांनी सुरु असलेल्या शहरातील सर्व ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दिल्या.

       पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत करावयाच्या उपाययोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृह येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक अधिकारी निखिल घर, नगरप्रशासन जिल्हा सहआयुक्त देवानंद ढेकळे, कोल्हापूर महानगरपालिका जल अभियंता हर्षजित घाटगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता मयुरी पाटील, इचलकरंजी मनपाच्या सुषमा शिंदे, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत रेवडेकर, कोल्हापूर पाटबंधारे उप विभागीय अधिकारी प्रकाश येरुले, एमआयडीसीचे एन. एस. दुधाळे, कुरुंदवाड, शिरोळ, हुपरी, हातकणंगले, मलकापूर पालिकेचे मुख्याधिकारी तसेच विविध कंपनीचे सल्लागार उपस्थित होते.

      जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड म्हणाले, कोल्हापूर शहरातील जयंती नाला, दुधाळी, लाईन बाजार व बापट कॅम्प या क्षेत्रातील तसेच इचलकरंजी शहरातील ड्रेनेजची व रस्त्यांची कामे अतिरिक्त मनुष्यबळ वापरुन तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. रंकाळा तलावात सांडपाणी मिसळू नये यावर उपाययोजना करा त्याचबरोबर या तलावावर कपडे धुणे, कचरा टाकणे या बाबी होऊ नये म्हणून पथकाची नेमणुक करा व कामाची एक एसओपी तयार करुन विविध विभागाने कामकाज वाटप करुन त्यानुसार कामे करण्यात यावीत. तलाव व नदीमधील प्रदूषण रोखण्यासाठी आगामी गणेशोत्सवा दरम्यान गणेश विसर्जनासाठी शहराच्या ठिकठीकाणी कृत्रिम कुंडाची व्यवस्थाही करण्यात यावी. महापालिका क्षेत्रात सांडपाण्यावर प्रक्रिया न करता नाल्यातून किंवा प्रत्यक्ष नदीपात्रात जात असेल तर अशा ठिकाणी संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

      कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरपरिषद, जलसंपदा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, विभागासह इतर विभागामार्फत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरावर भर; 21 व्या कोल्हापूर परीक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे उत्साहात उद्घाटन

आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरावर भर; 21 व्या कोल्हापूर परीक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मे…