no images were found
कोल्हापूर महापालिकेच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अभिवादन
कोल्हापूर, : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आज कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने छत्रपती ताराराणी सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापौर रुपाराणी निकम व उप-महापौर अक्षय जरग यांच्या हस्ते अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, गटनेते आदील फरास, नगरसेवक नियाज खान, नगरसेविका माधवी गवंडी, मानसी लोळगे, नगरसचिव सुनील बिद्रे, रवका अधिकारी प्रशांत पंडत, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, मुख्य अग्निशमन स्थानक अधिकारी दस्तगीर मुल्ला तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.