no images were found
डॉ. देव पुन्हा डॉक्टर म्हणून हॉस्पिटलमध्ये परततो, पण त्याच्या मनाला कठीण कसोटीला सामोरे जावे लागते सोनी सब वरील यादें
सोनी सब वरील यादें प्रेक्षकांना उबदारपणा, विनोद आणि भावनिक क्षणांचा सुंदर संगम दाखवत आहे, ज्याची पार्श्वभूमी रुग्णालयातील जीवन आहे. डॉ. देव (इक्बाल खान) हळूहळू आपले आयुष्य पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करत असताना, एक भावनिक टर्निंग पॉईंट त्याच्या वैयक्तिक प्रवासाला अनपेक्षित वळण देणार आहे.आगामी भागांमध्ये, डॉ. सनी (अनुराग शर्मा) वारंवार औषधांचा डोस वाढवून अंतिम मुलाखतीपूर्वी डॉ. देवला अपयशी करण्याचा प्रयत्न करतो. तरीही, डॉ. देव अखेर मुलाखत उत्तीर्ण होतो आणि अधिकृतपणे पुन्हा डॉक्टर म्हणून हॉस्पिटलमध्ये परततो, त्याच्या ओळखीचे प्रतीक असलेला पांढरा कोट पुन्हा मिळवतो. पांढरा कोट परत मिळवणे हा त्याच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरतो, पण हा क्षण झाकोळला जातो जेव्हा डॉ. सृष्टी (गुलकी जोशी) त्याला तिच्या लग्नाचे आमंत्रण देते आणि स्पष्ट करते की तिने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. या भावनिक धक्क्यामुळे देव बदलतो तो आपल्या भावना मागे सोडून अधिक मजबूत आणि लक्ष केंद्रीत रूप स्वीकारण्याचा निर्णय घेतो.
डॉ. देव परत डॉक्टर म्हणून येऊन आपल्या मनाच्या जखमा भरून काढतील का, की डॉ. सृष्टिचा निर्णय त्यांना कायमचा बदलून टाकेल?
आगामी ट्रॅकबद्दल बोलताना, इक़बाल खान सांगतात, “मला वाटतं या ट्रॅकचं खासपण म्हणजे जीवन एकाच वेळी तुम्हाला सर्वात मोठं यश आणि सर्वात मोठं दु:ख देऊ शकतं, हे सुंदरपणे दाखवणं. देवसाठी पुन्हा डॉक्टर होणं म्हणजे फक्त मुलाखत पास करणं किंवा पांढरा कोट घालणं नाही, तर स्वतःची ओळख परत मिळवणं आहे. पण ज्या क्षणी त्याला वाटतं की आयुष्य शेवटी योग्य मार्गावर चाललं आहे, त्या वेळी सृष्टि त्याला लग्नाचं आमंत्रण देते. तो क्षण त्याच्या भावनिक जगाला पूर्णपणे बदलून टाकतो. त्याच्या मनात अजूनही तिच्याबद्दल भावना आहेत, त्यामुळे नैसर्गिकरित्या खूप वेदना आणि निराशा आहे, पण उतावळेपणाने प्रतिक्रिया देण्याऐवजी तो ते आतल्या आत स्वीकारतो. इथेच प्रेक्षकांना त्याच्या व्यक्तिमत्त्वात बदल जाणवेल. तो कटू किंवा उद्धट होत नाही; उलट तो अधिक मजबूत, लक्ष केंद्रीत आणि भावनिकदृष्ट्या सजग होतो.”