Home Uncategorized ऑनलाईन सेवांचा विस्तार करा; नागरिकांना ऑनलाईन सेवा घरबसल्या मिळाव्या : – राज्य आयुक्त सुधाकर तेलंग

ऑनलाईन सेवांचा विस्तार करा; नागरिकांना ऑनलाईन सेवा घरबसल्या मिळाव्या : – राज्य आयुक्त सुधाकर तेलंग

0 second read
0
0
6

no images were found

ऑनलाईन सेवांचा विस्तार करा; नागरिकांना ऑनलाईन सेवा घरबसल्या मिळाव्या : – राज्य आयुक्त सुधाकर तेलंग

कोल्हापूर (इचलकरंजी) : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी आज इचलकरंजी महानगरपालिकेला भेट देऊन मनपाकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी आयुक्त पल्लवी पाटील,अति आयुक्त सुषमा शिंदे – कोल्हे प्रामुख्याने उपस्थित होत्या .
याप्रसंगी आयुक्त पल्लवी पाटील यांनी स्लाईड प्रेझेंटेशनद्वारे महापालिकेच्या डिजिटल सेवांची माहिती सादर केली.प्रस्तुतीकरणात त्या म्हणाल्या, महापालिकेकडून एकूण ६७ सेवा उपलब्ध असून या सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले .
यावेळी श्री तेलंग म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाचा मुख्य उद्देश नागरिकांना शासनाच्या सेवा विहित मुदतीत आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देणे हा आहे. या सेवा वेळेत न मिळाल्यास नागरिकांना अपील किंवा तक्रार करण्याचा कायदेशीर अधिकार आहे . नागरिकांना शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता भासू नये, त्यांनी घरी बसून ऑनलाईन अर्ज करावा आणि त्याचे उत्तरही ऑनलाईनच मिळावे अशी व्यवस्था उभी करणे ही काळाची गरज आहे.तसेच श्री तेलंग यांनी येथील महापालिकेचे ऑनलाईन सेवांमधील काम अत्यंत समाधानकारक असल्याचे गौरवोद्गार काढले .
त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देताना श्रीमती पाटील म्हणाल्या ,दि.15 ऑगस्टनंतर कोणत्याही नागरिकांचे ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार नाहीत. याबाबत महासभेकडे आगामी बैठकीत प्रस्ताव ठेवून त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी श्री तेलंग यांना दिली .
यावेळी उप-सचिव अनुराधा खानविलकर, कक्ष अधिकारी रंजना गवारी,कक्ष अधिकारी शिल्पा पुरोहित,उपायुक्त सर्वश्री राहूल मर्ढेकर,अशोक कुंभार , नंदू परळकर,विद्या कदम,मुख्य लेखाधिकारी विकास खोळपे ,सहा आयुक्त रोशनी गोडे ,सुनिल शिंदे आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा

· शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योज…