no images were found
एनएसई क्रूड ऑईल ऑप्शन्समध्ये विक्रमी प्रीमियम उलाढाल, वॉल्यूम आणि ओपन इंटरेस्टची नोंद
मुंबई,:-नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाने जाहीर केले आहे की, ९ जुलै २०२६ रोजी त्यांच्या क्रूड ऑईल ऑप्शन्सने २,००६.४९ कोटी रुपयांची आतापर्यंतची सर्वोच्च दैनिक प्रीमियम उलाढाल केली आहे. तसेच यादरम्यान ४७,३३,८६२ कॉन्ट्रॅक्ट्सचे वॉल्यूम (व्यापार संख्या) आणि १,१४,००० हून अधिक इंट्राडे ओपन इंटरेस्ट कॉन्ट्रॅक्ट्सचा टप्पा पार करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.हे महत्त्वाचे टप्पे कच्चे तेल म्हणजेच क्रूड ऑईलच्या किमतींमधील जोखमीचे व्यवस्थापन करण्यासाठी या उत्पादनाचा वाढता वापर आणि त्याला मिळणारी पसंती अधोरेखित करतात.
बाजारपेठेतील घटकांकडून मिळालेल्या अभिप्रायानंतर, लवचिकता आणि जोखीम व्यवस्थापन अधिक सुलभ करण्यासाठी एनएसईने ६ नोव्हेंबर २०२५ पासून कराराची मुदत संपण्याची तारीख बदलली होती. त्यानुसार, मूळ फ्युचर्स कराराची मुदत संपण्याच्या दोन व्यावसायिक दिवसांऐवजी सात व्यावसायिक दिवस आधी ही मुदत संपेल अशी सुधारणा करण्यात आली होती.
या सुधारणेनंतर, ट्रेडिंगमधील हालचालींमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. यापूर्वीच्या एक्स्पायरी दरम्यान (९ जून २०२६ रोजी), २८,६४,६१८ कॉन्ट्रॅक्ट्सचे ट्रेडिंग झाले होते आणि १,२३९.१० कोटी रुपयांची प्रीमियम उलाढाल झाली होती; तर क्रूड ऑईल फ्युचर्समध्ये ३७८.३२ कोटी रुपयांच्या विक्रमी उलाढालीची नोंद झाली होती.
आपल्या कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज उत्पादनांमध्ये सातत्याने सुधारणा आणि विस्तार करत राहू, असे एनएसईने म्हटले आहे. याच धर्तीवर, एनएसईने नॅचरल गॅस ऑप्शन्सची एक्स्पायरी देखील फ्युचर्स एक्स्पायरीच्या चार व्यावसायिक दिवस आधी संपेल अशी सुधारणा २५ मे २०२६ पासून लागू केली आहे.