Home मनोरंजन लपंडाव मालिकेतल्या अपघाताच्या सीनसाठी रुपाली भोसलेची जीवतोड मेहनत

लपंडाव मालिकेतल्या अपघाताच्या सीनसाठी रुपाली भोसलेची जीवतोड मेहनत

4 second read
0
0
6

no images were found

लपंडाव मालिकेतल्या अपघाताच्या सीनसाठी रुपाली भोसलेची जीवतोड मेहनत

स्टार प्रवाहवरील लपंडाव मालिकेत सध्या एकामागून एक धक्कादायक घडामोडी घडत असून, नुकत्याच प्रसारित झालेल्या भीषण अपघाताच्या प्रसंगाने प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले आहे. या थरारक सीनमागे अभिनेत्री रुपाली भोसले आणि संपूर्ण मेकअप टीमची प्रचंड मेहनत दडलेली आहे.

मालिकेत ‘सरकार’ आणि ‘तेजस्विनी’ अशी दोन पूर्णपणे वेगळी रूपं साकारणाऱ्या रुपाली भोसलेची सध्या दुहेरी कसरत सुरु आहे. अपघाताच्या प्रसंगासाठी तर रुपालीचा विशेष मेकअप करण्यात आलाय. याबद्दल सांगताना रुपाली म्हणाली, ‘या गेटअपसाठी तयार व्हायला खूप वेळ लागतो. सरकार आणि तेजस्विनी असे दोन लूक करावे लागतात. जितका वेळ तयार व्हायला लागतो, तितकाच वेळ मेकअप काढण्यासाठीही लागतो. आमची मेकअप टीम प्रत्येक गोष्टीवर अतिशय बारकाईने काम करते. कधी कधी खूप धावपळ होते, पण जेव्हा प्रेक्षकांकडून या पात्रावर आणि मालिकेवर कौतुकाचा वर्षाव होतो तेव्हा सगळी मेहनत सार्थकी लागल्यासारखं वाटतं. त्यामुळे आणखी चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळते.

रुपालीने यावेळी एक खास आठवणही सांगितली. ती म्हणाली, ‘दिवंगत अभिनेते रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदुला भाटकर यांनीही ही मालिका आवर्जून पाहत असल्याचं आणि माझ्या कामाचं कौतुक केलं. त्यांच्या तोंडून मिळालेली ही कौतुकाची थाप माझ्यासाठी खूप मोठी आणि मोलाची आहे. अशा प्रतिक्रिया कलाकार म्हणून अधिक जबाबदारीची जाणीव करून देतात.’

रुपाली भोसलेच्या दमदार अभिनयासोबतच तिने प्रत्येक लूकसाठी घेतलेली मेहनत लपंडाव मालिकेला वेगळ्या उंचीवर घेऊन जात आहे. त्यामुळे मालिकेतील पुढील घडामोडी पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. तेव्हा नक्की पाहा लपंडाव दुपारी २ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

अदाणी–डायऑक्सीकल भागीदारी द्वारे कमी-कार्बन रासायनिक उत्पादनाला चालना

अदाणी–डायऑक्सीकल भागीदारी द्वारे कमी-कार्बन रासायनिक उत्पादनाला चालना अहमदाबाद आणि पॅरिस, …