Home सामाजिक लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि त्यांवरील उपाययोजना यांवर कोल्हापुरात ७ जूनला विशेष व्याख्यान !

लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि त्यांवरील उपाययोजना यांवर कोल्हापुरात ७ जूनला विशेष व्याख्यान !

11 second read
0
0
12

no images were found

लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि त्यांवरील उपाययोजना यांवर कोल्हापुरात ७ जूनला विशेष व्याख्यान !

कोल्हापूर – महाराष्ट्रात सातत्याने ‘लव्ह जिहाद’ची धक्कादायक नवी प्रकरणे उघडकीस येत आहेत. अमरावती येथे अयान अहमदने १८० मुलींचे शारीरिक शोषण करून त्यांची आक्षेपार्ह छायाचित्रे समाजमाध्यमांत टाकल्याची घटना असो, की कोल्हापुरात ठराविक कालावधीनंतर समोर येणारी अशीच इतर प्रकरणे असोत, सद्यस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि हिंदू समाजाला या धोक्यापासून सावध करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

       हे व्याख्यान ७ जून या दिवशी कोल्हापूर येथील ‘पद्माराजे गर्ल्स हायस्कूल’च्या (पेटाळा) राम गणेश गडकरी सभागृहात, खरी कॉर्नरजवळ सायंकाळी ५.३० वाजता पार पडणार आहे. या व्याख्यानात प्रामुख्याने सर्वप्रथम ‘लव्ह जिहाद’ या विषयावर ग्रंथ लिहिणारे लेखक तथा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, तसेच सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये उपस्थितांना या विषयाचे गांभीर्य आणि त्यावरील उपाययोजना यांविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

         टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस’ मधील ‘कॉर्पोरेट जिहाद’चे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आज हजारो पालक त्यांच्या मुलींच्या भविष्याविषयी प्रचंड चिंतेत आहेत. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचे दोन भाग प्रसिद्ध होऊनही हिंदू समाज या संकटाविषयी अजूनही तितकासा जागृत झालेला दिसत नाही. अशी एकामागून एक अनेक प्रकरणे समोर येत असताना आपण आताच जागे झालो नाही, तर उद्या आपल्याही घरात अशी दुर्दैवी घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

       या पार्श्‍वभूमीवर, आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि या छुप्या संकटाचा सामना कसा करावा, हे समजून घेण्यासाठी सर्व हिंदू बांधव, युवती, माता-भगिनी आणि विशेषतः पालकांनी त्यांच्या मुलींना सोबत घेऊन या व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

शिवाजी विद्यापीठात ६ जूनपासून ‘पायपिंग अँड प्रोसेस प्लँट इंजिनिअरिंग’ कार्यशाळा

शिवाजी विद्यापीठात ६ जूनपासून ‘पायपिंग अँड प्रोसेस प्लँट इंजिनिअरिंग’ कार्यशाळा कोल्हापूर,…