Home Uncategorized डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या सिव्हिलच्या ४० विद्यार्थ्यांची निवड

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या सिव्हिलच्या ४० विद्यार्थ्यांची निवड

2 second read
0
0
102

no images were found

    डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या सिव्हिलच्या ४० विद्यार्थ्यांची निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी): डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडा येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील तब्बल ४० विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे.

महाविद्यालयाच्या २ विद्यार्थ्यांची व्हीकन्स्ट्रक्ट कंपनीमध्ये वार्षिक ५.२५ लाख रुपयांच्या पॅकेजवर निवड झाली आहे. प्लॅनएज कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या भारतातील अग्रगण्य प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंपनीमध्ये ९ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांना वार्षिक ३ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. तसेच जेपीडब्ल्यू इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेडमध्ये एका विद्यार्थ्याची ३.६ लाख रुपयांच्या पॅकेजवर निवड झाली आहे.

याशिवाय डी. वाय. पाटील कन्स्ट्रक्शन फर्ममध्ये ९, लॉन्चेड कंपनीमध्ये ३, लक्ष्मी ऑर्गॅनिक्स, गोदरेज प्रॉपर्टीज, गुब्बी सिव्हिल इंजिनिअर्स लिमिटेड मध्ये प्रत्येकी २ तर एस. जे. कन्स्ट्रक्ट व जीएचके हॉस्पिटॅलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड व अन्य कंपन्यामध्ये प्रत्येकी एका विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे टेक्निकल ट्रेनिंग, सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यू प्रिपरेशन आणि कम्युनिकेशन स्किल्स प्रशिक्षण आयोजित केले जाते. या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना प्लेसमेंट प्रक्रियेमध्ये मोठा फायदा होत असल्याचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी सांगितले.

या विद्यार्थ्यांना अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे, विभागप्रमुख डॉ. किरण माने, विभाग प्लेसमेंट समन्वयक तसेच सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, सी.एच.आर.ओ. श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे आणि रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली

शिवसेनेची विकासाची भगवी दहीहंडी जय महाराष्ट्र तरुण मंडळाने फोडली : आमदार राजेश क्षीरसागर य…