Home Uncategorized ऊसतोड कामगारांच्या बाबतीत आर्थिक मदतीचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत – निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव

ऊसतोड कामगारांच्या बाबतीत आर्थिक मदतीचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत – निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव

3 second read
0
0
8

no images were found

ऊसतोड कामगारांच्या बाबतीत आर्थिक मदतीचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत – निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव

कोल्हापूर  :  ऊसतोड मजुरांना साखर कारखान्यांकडून जास्तीत जास्त सुविधांचा लाभ मिळावा तसेच त्यांच्या बाबतीतील आर्थिक मदतीचे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीसमोर सादर करावेत असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिले.

     गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ अनुदान योजनेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात घेण्यात आली. ते म्हणाले,ऊसतोड कामगार हा आर्थिकदृष्ट्या तितकासा सक्षम नसतो .त्यांना मदत करताना मानवीय दृष्टिकोन बाळगण्यात यावा.जखमी कामगारांच्या बाबतीत संबंधित साखर कारखान्यांनी वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. तसेच काही ऊसतोड कामगारांच्या आर्थिक मदतींच्या प्रस्तावांवर सिव्हिल सर्जन यांचा अभिप्राय घेण्यात यावा. प्रस्ताव सादर करताना यामध्ये कोणत्याही स्वरूपाची त्रुटी राहू नये याची दक्षता घेण्यात यावी. प्रारंभी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे यांनी सानुग्रह अनुदानाच्या अनुषंगाने सादर झालेल्या प्रस्तावांबाबतची माहिती या बैठकीत दिली.या बैठकीसाठी डॉ.रेश्मा पाटील, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.सुशांत रेवडेकर , महेंद्र कांबळे , बी बी पाटील यांच्यासह समाजकल्याण विभागाचे इतर अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते .

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

कोल्हापूर शहरातील सर्व मिळकतींना मिळणार प्रॉपर्टी कार्ड; भारत सर्वेक्षण संस्थेसोबत करार पूर्णत्वाला; आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश

कोल्हापूर शहरातील सर्व मिळकतींना मिळणार प्रॉपर्टी कार्ड; भारत सर्वेक्षण संस्थेसोबत करार पू…