Home गौरव सन्मान युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिकाकडून डॉ. संजय डी. पाटील यांना डॉक्टरेट

युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिकाकडून डॉ. संजय डी. पाटील यांना डॉक्टरेट

30 second read
0
0
12

no images were found

युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिकाकडून डॉ. संजय डी. पाटील यांना डॉक्टरेट

कोल्हापूर (प्रतिनिधी):शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि समाजात न्याय्य व समतोल शिक्षणव्यवस्था निर्माण करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल डी. वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना अमेरिकेतील  ‘युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका’तर्फे ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ (डी. लिट.) ही मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. एलिव्हेट हेल्थकेअरचे आंतरराष्ट्रीय संचालक रिचर्ड लिवसी यांच्या हस्ते डॉ. पाटील यांना सन्मानित करण्यात आले.            डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष आणि डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल विद्यापीठ आकुर्डी आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदेचे कुलपती म्हणून डॉ. संजय डी. पाटील यांना उच्च शिक्षण क्षेत्रात अविरत योगदान देत आहेत. शिक्षण प्रसार, सामाजिक बांधीलकी आणि सार्वजनिक जीवनातील कार्यातून विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक जागृती निर्माण करण्यासाठी विशेष योगदान या कार्याबद्दल डॉ. एस. राधाकृष्णन टीचर्स वेल्फेअर असोसिएशन, इंडिया यांच्या शिफारसीनुसार ‘युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका’ने ही डॉक्टरेट दिली आहे.

     डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात झालेल्या विशेष समारंभावेळी डी. वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र- कुलपती तथा विश्वस्त  ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, एलिव्हेट हेल्थकेअरचे नॅशनल हेड प्रवीण मित्तल, डी वाय पाटील विद्यापीठ मुंबईचे प्रोजेक्ट हेड वृंदन जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

     डॉ. संजय डी. पाटील यांच्या  नेतृत्वाखाली डी. वाय. पाटील समूहाच्या ५० हून अधिक शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत.  या संस्थांमध्ये सुमारे ४७ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कृषी, आर्किटेक्चर, फार्मसी, नर्सिंग, फ़िजिओथेरपी, हॉटेल मॅनेजमेंट, तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे कार्य डॉ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. या कार्याबद्दल डॉ. पाटील यांना यापूर्वी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. हिमाचल प्रदेश विद्यापीठानेही तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते २०१३ मध्ये डॉक्टरेट पदवीने डॉ. पाटील यांना सन्मानित केले आहे.

       यावेळी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही व्ही भोसले,  कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, डी. वाय. पाटील विद्यापीठ नवी मुंबईचे कुलसचिव डॉ. नितीन सिप्पी,  परीक्षा नियंत्रक अभय जोशी, सी.एच.आर.ओ श्रीलेखा साटम, आयक्यूसएसी  संचालिका डॉ.  शिंपा शर्मा, सिम्युलेशन सेंटर हेड डॉ. संकेत पाटील, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, उपअधिष्ठाता डॉ. पद्मजा देसाई, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांच्यासह विद्यापीठाचे सर्व अधिकारी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थांचे प्रमुख, विभाग प्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते

      *आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून मिळालेल्या डॉक्टरेटमुळे  माझ्या शैक्षणिक कार्याला अधिक उर्जा मिळेल.  शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देणे, हेच माझे ध्येय राहील. हा सन्मान डी. वाय. पाटील समूहातील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि सहकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे.* -डॉ. संजय डी. पाटील अध्यक्ष, डी. वाय. पाटील ग्रुप
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In गौरव सन्मान
Comments are closed.

Check Also

हिंदू देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला घालणारा ‘इनाम निर्मूलन कायदा’ तात्काळ मागे घ्या; अन्यथा राज्यव्यापी जनआंदोलन छेडणार! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

हिंदू देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला घालणारा ‘इनाम निर्मूलन कायदा’ तात्काळ मागे घ्या; अन्…