Home मनोरंजन ‘उमंग टुडे’स वूमन तर्फे उल्लेखनीय कामगिरीचा महागौरव पुरस्कार संपन्न, दिग्गज कलाकारांची उपस्थिती

‘उमंग टुडे’स वूमन तर्फे उल्लेखनीय कामगिरीचा महागौरव पुरस्कार संपन्न, दिग्गज कलाकारांची उपस्थिती

0 second read
0
0
6

no images were found

‘उमंग टुडे’स वूमन तर्फे उल्लेखनीय कामगिरीचा महागौरव पुरस्कार संपन्न, दिग्गज कलाकारांची उपस्थिती

कोल्हापूर-मुंबई येथे ‘उमंग टुडे’स वूमन आणि व्हिक्टर मणिकम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महागौरव पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा भव्य सोहळा मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता अशोक सराफ आणि डॉ. जयश्री राजगोपालन, संस्थापक – नित्रयोदय अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स हे होते.
महाराष्ट्रातील मराठी उद्योग, शिक्षण, फॅशन, तंत्रज्ञान, कला, समाजसेवा तसेच विविध स्वयंसेवी संस्थांमधील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा या वेळी गौरव करण्यात आला. एकूण १०० हून अधिक कर्तृत्ववान व्यक्तींना त्यांच्या समाजासाठीच्या कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. ‘उमंग टुडे’स वूमनच्या प्रतिनिधी निकिता यांनी सांगितले,
“महाराष्ट्रातील १०० उत्कृष्ट व्यक्तींना सन्मानित करण्याचा मान आम्हाला मिळाला, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
या सोहळ्यात कल्पना अय्यर, मल्लिका प्रसाद, विजय पाटकर, योगिनी चौक, गौरी नळावडे, तुषार देशमुख, ऐश्वर्या हरिश यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता. सुमारे ८०० हून अधिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांसाठी वुमन ऑफ स्टील हा विशेष सन्मान ‘नीलम स्टेनलेस स्टील’ यांच्या सहकार्याने देण्यात आला, तर पुरुष व महिला दोघांसाठी महागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘उमंग टुडे’स वूमन पुढील काळातही अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम आणि पुरस्कार सोहळे आयोजित करून समाजासाठी सकारात्मक योगदान देत राहील, असे आयोजकांनी सांगितले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

पन्हाळगड परिसरात 10 मेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

पन्हाळगड परिसरात 10 मेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू कोल्हापूर : पन्हाळा येथील हजरत पीर शह…