Home राजकीय आम आदमी पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष मयूर दौंडकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

आम आदमी पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष मयूर दौंडकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

0 second read
0
0
20

no images were found

आम आदमी पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष मयूर दौंडकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

जगातील एक सर्वात मोठी राजकीय पार्टी म्हणून भारतीय जनता पक्षाची ओळख आहे. हा पक्ष समाजाच्या तळागाळात पोचला असून, विकासाची दृष्टी असलेला आणि प्रखर राष्ट्रवादाची भूमिका घेतलेला पक्ष आहे. त्यामुळेच आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहोत, अशी भावना आम आदमी पार्टीचे माजी युवा प्रदेशाध्यक्ष मयूर दौंडकर यांनी व्यक्त केली. विधान परिषदेचे आमदार अमित गणपत गोरखे यांच्या पुढाकारातून आणि भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज धनंजय महाडिक यांच्या सहकार्यातून, दौंडकर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दौंडकर यांना पक्षाचा स्कार्फ देऊन, त्यांचे स्वागत केले. यापुढे भाजपमध्ये सक्रिय राहून पक्षाची ध्येय धोरणे आणि विकासाच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे अशी अपेक्षा, रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. तर मयूर दौंडकर यांनीही भाजपमध्ये अधिक ताकदीने काम करू, अशी ग्वाही दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जनहिताचे आणि समाजकारणाचे उपक्रम यशस्वीपणे राबवू, आणि एक सच्चा भाजप कार्यकर्ता म्हणून काम करत राहू अशी ग्वाही मयूर दौंडकर यांनी दिली. यावेळी भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…