Oplus_131072
no images were found
सेटवर सुरु झालेली कथा, अस्तित्वात उतरेल का ? मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी कलर्स मराठीवर!
पहा २३ मार्चपासून दररोज संध्या ७.३० वा.
कोल्हापूर–: चंदेरी दुनियेचं आकर्षण प्रत्येकालाच भुरळ घालतं, पण त्या चमकदार पडद्यामागे दडलेला संघर्ष, स्वाभिमान आणि भावनांची गुंतागुंत फार कमी लोकांना दिसते. ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ ही अशाच एका वेगळ्या प्रेमकथेवर आधारित आहे. या कथेत मोहिनी आणि आरके या दोन व्यक्तींचं आयुष्य दाखवण्यात येणार आहे, जिथे प्रेमापेक्षा स्वाभिमान आणि अहंकार आधी येतात.
मोहिनी ही पडद्यामागच्या जगात वाढलेली, संघर्षातून स्वतःची ओळख निर्माण करणारी, स्ट्रीट-स्मार्ट आणि खंबीर मुलगी आहे. तिचं स्वप्न आहे स्वतःच्या बळावर आयुष्य उभं करणं आणि तिच्या आईचा हरवलेला सन्मान परत मिळवणं. दुसरीकडे आरके हा लोकप्रिय पण अहंकारी सुपरस्टार आहे, ज्याच्या भूतकाळात खोल जखमा दडलेल्या आहेत. त्यांच्या पहिल्याच भेटीत निर्माण होणारा संघर्ष पुढे एका गुंतागुंतीच्या नात्यात बदलतो.
या मालिकेत शालिनी, महेंद्र, ललिता, आरके, मोहिनी आणि प्रताप ही पात्रं महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. अभिनेत्री सोनाली पंडित नाईक या तब्बल १० वर्षांनंतर मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करत असून त्यांच्या भूमिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
मालिकेबद्दल बोलताना निर्मात्यांनी सांगितलं की, ही कथा केवळ प्रेमकथा नसून स्वाभिमान, ओळख, संघर्ष आणि जिद्द यांचा प्रवास आहे. बॉलिवूडच्या चकाकीमागील वास्तव आणि भावनिक प्रवास प्रेक्षकांना या मालिकेत अनुभवायला मिळणार आहे.
एक वेगळी, भावनिक आणि थरारक प्रेमकहाणी अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनी ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ नक्की पाहावी, असं आवाहन करण्यात येत आहे.