Home सामाजिक अनुसूचित जाती(SC) आरक्षण बचाव जन आंदोलन समितीच्या वतीने 9 मार्च रोजी भव्य संघर्ष महामोर्चाचे आयोजन 

अनुसूचित जाती(SC) आरक्षण बचाव जन आंदोलन समितीच्या वतीने 9 मार्च रोजी भव्य संघर्ष महामोर्चाचे आयोजन 

32 second read
0
0
28

no images were found

अनुसूचित जाती(SC) आरक्षण बचाव जन आंदोलन समितीच्या वतीने 9 मार्च रोजी भव्य संघर्ष महामोर्चाचे आयोजन 

कोल्हापूर- अनुसूचित जाती (SC) आरक्षण बचाव जना आंदोलन समितीच्या वतीने खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवून संवैधानिक आरक्षण व्यवस्थेचा गैरवापर करणाऱ्या विरोधात ९ मार्च रोजी “भव्य संघर्ष महामोर्चा” आयोजित करण्यात आला आहे.

        समितीच्या वतीने करण्यात आलेल्या आरोपानुसार, श्री दरगोंडा बसगोंडा पाटील (महेश पाटील) यांनी अनुसूचित जाती (SC-लिंगडेर) प्रवर्गातील खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे पट्टणकोडोली येथून जिल्हा परिषद निवडणूक लढवून सत्तेत प्रवेश केला आहे. तसेच गडहिंग्लज-नगराध्यक्ष  श्री.महेश महादेव तुरबतमठ आणि इचलकरंजी येथील नगरसेविका सौ.अलका अशोक स्वामी यांनीही SC आरक्षणाच्या जागांवर बोगस जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवून संवैधानिक आरक्षण व्यवस्थेचा उघड गैरवापर केला आहे.

        समितीने म्हटले आहे की, हा प्रकार केवळ कायद्याचा भंग नसून अनुसूचित जाती समाजाच्या हक्कांवर थेट आघात आहे. खऱ्या SC उमेदवारांची संधी यामुळे हिरावली गेली असून त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वावर गदा आणण्यात आली आहे. त्यामुळे समाजाच्या भावी पिढीचे भविष्य अंधारात ढकलले जात असल्याची तीव्र भावना समाजामध्ये निर्माण झाली आहे.

      या पार्श्वभूमीवर संबंधितांची जात प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करावीत, त्यांची पदे बरखास्त करावीत आणि दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करावी, अशी समितीची ठाम मागणी आहे. या सर्व मागण्यासाठी संघर्ष महामोर्चा आयोजित करण्यात आला असून सर्व बौद्ध, मातंग ,चर्मकार, खाटीक ,वाल्मिकी, बुरुड आधी प्रवर्गातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

       कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये श्री. दरगोंडा बसगोंडा उर्फ महेश पाटील (पटणकोडोली जि. प. सदस्य) श्री.महेश महादेव तुरबतमठ ( गडहिंग्लज -नगराध्यक्ष) आणि सौ.अलका अशोक स्वामी (इचलकरंजी- नगरसेविका) यांची अनुसूचित जातीची प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करावीत. अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षित जागेवर जातीची खोटी प्रमाणपत्रे सादर करून निवडून आलेल्यांची पदे त्वरित बरखास्त करावीत.कुठे जात प्रमाणपत्रांच्या आधारे शासनाची व निवडणूक आयोगाची केलेली संविधानविरोधी कृती घटनाविरोधी असून अशा गुन्हेगारांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत.

      अशा घटनाविरोधी कृत्य करणाऱ्या राजकीय गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या व त्यांना खोटी जातीचे प्रमाणपत्रे देणाऱ्या व छाननी मध्ये अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या श्री.दीपक शिंदे ( उपविभागीय अधिकारी, इचलकरंजी) श्री.महेश खिलारे (अप्पर तहसीलदार,इचलकरंजी)

श्री.ऋषिकेत शेळके (कार्यकारी दंडाधिकारी, गडहिंग्लज)  श्री. एकनाथ काळबांडे (उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज) यांच्यावर फौजदारी कारवाई करून, यांची खातेनिहाय चौकशी करून, त्यांच्या बेनामी संपत्तीची चौकशी करून, त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी. इथून पुढे अशा घटनाविरोधी कृत्यांना आळा घालण्यासाठी शासनाने जात पडताळणी प्रमाणपत्र प्रक्रिया अधिक कडक व पारदर्शी करावी.

       या पत्रकार परिषदेला उत्तमदादा कांबळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार राजीव आवळे, नगरसेवक दुर्वास बापू कदम, पॅंथर शिवाजीराव कवाळे, डी.जी. भास्कर, सुभाष देसाई, प्रेमानंद मौर्य, डॉ. शरद गायकवाड, डॉ. अनिल माने, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे, दीपक खांडेकर ,श्रीकांत मोरे, प्रमोद कदम, राजेंद्र ठीकपुर्लीकर, बाळासाहेब भोसले, पांडुरंग कांबळे,भाऊसो काळे, दत्ता मिसाळ,  जयसिंग पाडळीकर, बाळासाहेब वाशीकर, प्रदीप मस्के,अशोक घाडगे,हरी कांबळे,सुभाष कांबळे, संदीप हेर्लेकर, प्रज्योत सूर्यवंशी आदी उपस्थित होते. वैभव प्रधान यांनी आभार मानले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…