Oplus_131072
no images were found
शिवाजी विद्यापीठाची राजर्षी शाहू संगीत रजनी स्थगित
कोल्हापूर, (प्रतिनिधी): महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्र शासनाने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे येत्या २९ व ३० जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली राजर्षी शाहू संगीत रजनी स्थगित करण्यात आली आहे, असे अधिविभाग प्रमुख डॉ. विनोद ठाकूर देसाई यांनी कळविले आहे. सदर संगीत रजनीसंदर्भातील पुढील नियोजन यथावकाश कळविण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.