Home राजकीय “हे आम्ही करणार नाही”  आप च्या उमेदवारांचे अनोखे शपथपत्र 

“हे आम्ही करणार नाही”  आप च्या उमेदवारांचे अनोखे शपथपत्र 

11 second read
0
0
29

no images were found

“हे आम्ही करणार नाही”  आप च्या उमेदवारांचे अनोखे शपथपत्र 

कोल्हापूर (प्रतिनिधी):महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीने राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून चौदा उमेदवार उभे केले आहेत. या उमेदवारांनी अनोखे शपथपत्र सादर करत या गोष्टी आम्ही करणार नाही असा स्टॅम्प लिहून दिला आहे. 

      मी निवडून आलो तर कोणत्याही कामात टक्केवारी खाणार नाही, माझा कोणताही अवैध व्यवसाय नाही, मी नगरसेवक झाल्यावर कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणार नाही, जनसंपर्कासाठी माझा फोन चोवीस तास सुरु असेल, मी निवडून आल्यानंतर मी ज्या पक्षातून निवडून आलो आहे तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाही अशी हमी देणारे शपथपत्र आप च्या उमेदवारांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. 

       ही निवडणूक फक्त विकासकामांसाठी नाही तर महापालिका राजकारणात वावरत असलेल्या चुकीच्या प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी देखील असल्याचे आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले. यावेळी आप चे सर्व उमेदवार उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…