no images were found
‘स्थास्वस्थं’ निवडणूक निकाल पवारांचा ‘एनडीए’ प्रवेशाचा मार्ग सुकर करणार!‘आयएसी’चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांचा दावा
पुणे, : राज्यात येत्या १५ जानेवारीला होवू घातलेल्या महानगर पालिका निवडणुकीचा निकाल देशाचे दिग्गज नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा ‘एनडीए’ प्रवेशाचा मार्ग सुकर करेल, असा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी रविवारी (ता.२८) केला.मुंबई महानगर पालिका निवडणुकीत कॉंग्रेसने वंचितला सोबत घेतल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसची (शरद पवार) शिवसेना उबाठा सोबत बोलणी सुरू आहे. पंरतु, यात त्यांना फासशा जागा सुटण्याची शक्यता नाही. अशात मित्रपक्षांकडून होणाऱ्या कोंडीमुळे पवार राजकीय भाकरी फिरवू शकतात, असे पाटील म्हणाले.
एकीकडे कॉंग्रेस पासून लांब राहायचे आणि दुसरीकडे अजित पवारांच्या पक्षासोबत एकत्र येण्यासंदर्भात बोलणी सुरू ठेवायची, हे येत्या काळात होणाऱ्या राजकीय बदलाची नांदी ठरत असल्याचे पाटील म्हणाले. निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस जरी स्वतंत्र लढल्या तरी निकालानंतर त्या एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजित पवारांनी रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यासोबत निवडणुकासंदर्भात चर्चा केली आहे.मात्र, दोन्ही पक्ष अद्याप एकत्र निवडणूक लढवण्यासंदर्भात निर्णय घेवू शकलेले नाहीत.
तर,दुसरीकडे शरद पवार यांच्या एनडीए मध्ये शामिल होण्याच्या हालचालींना वेग आला असल्याची चर्चा आहे.या चर्चेचा फायदा शरद पवारांच्या गटाला निवडणुकीत होवू शकतो, असे देखील पाटील म्हणाले.शेवटी सत्तेत राहण्यासाठी आणि पक्ष पुन्हा एकसंघ ठेवण्यासाठी पवार एनडीए सोबत येवू शकतात, हे सध्या सुरू असलेल्या राजकीय हालचालीवरून स्पष्ट होत असल्याचा दावा पाटील यांनी केला. असे झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला आणखी राजकीय बळ मिळेल, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.