Home Uncategorized स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण

14 second read
0
0
27

no images were found

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण

 महाराष्ट  : बियोदनाबाद, श्री विजया पुरम, पोर्टब्लेअर,अंदमान येथे येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्य डॉ. मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते आणि केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक ‘व्हॅल्युएबल ग्रुप’चे संचालक श्री अमेय हेटे यांच्या संकल्पनेतून हा पुतळा साकारण्यात आला आहे. वि. दा. सावरकरांच्या राष्ट्रनिष्ठा, त्याग आणि निर्भय चिंतनाचे हे सजीव प्रतीक ठरणार आहे.हा पुतळा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या श्री राम सुतार यांनी डिझाइन करून साकारलेली आहे.

या सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे साँस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार यांची सन्माननीय उपस्थिती राहणार असून, या कार्यक्रमाला इतरही क्षेत्रांतील मान्यवर हजर राहणार आहेत. यामध्ये पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर, श्रीमती उषा मंगेशकर, अभिनेता रणदीप हुडा आणि इतिहासकार-लेखक डॉ. विक्रम संपत, प्रख्यात अभिनेते शरद पोंक्षे यांचा समावेश आहे.

“सागरा प्राण तळमळला…” या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी सागरांच्या लाटांना साक्षी ठेऊन रचलेल्या या महान काव्याला ११६ वर्षे उलटली आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून ‘व्हॅल्युएबल ग्रुप’तर्फे १२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३:०० वाजता श्री विजया पुरम, पोर्टब्लेअर येथे “सागरा प्राण तळमळला” या विशेष कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर यांच्या सुरेल, भावपूर्ण सादरीकरणामुळे या कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढणार असून, सावरकरांच्या साहित्यिक वारशाला एक अनोखी, संगीतबद्ध आदरांजली ‘व्हॅल्युएबल ग्रुप’तर्फे दिली जाणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…