no images were found
न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये नवोदित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी):श्री प्रिंन्स शिवाजी मराठा बोर्डिंग संचलित न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उंचगाव मध्ये विद्यार्धी स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते . फार्मसी क्षेत्रातील शैक्षणिक वर्ष २०२५-२६ प्रवेश प्रक्रिया ही रखडली गेली होती ,परंतु खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आणि उत्साहात विद्यार्थ्यानी कॉलेजला हजेरी लावली.
डी. फार्मसी आणि बी. फार्मसी प्रथम वर्षातील विदयार्ध्याना महाविद्यालयातील प्रत्येक घटकाची माहिती व ओळख व्हावी तसेच त्यांना महाविद्यालयाच्या नवीन वातावरणाशी जुळवून घेता यावे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
छत्रपती शाहू महाराज व सरस्वती देवी, यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर दीपप्रज्वलन करुण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बी. जी. बोराडे सर, संस्थेचे चेरमन श्री. डॉ. के. जी. पाटील , व्हा. चेरमन श्री. दि. जी. किल्लेदार , संचालिका सौ. स्वाती. ए. निगडे, विकास अधिकारी डॉ. एस. एच . दाभोळे ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. कुंभार सर, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्तिथ होते.
प्रथम सत्रात प्राचार्य डॉ. आर. बी. कुंभार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महाविद्यालयात प्राध्यापक वर्गाने पी.पी.टी. द्वारे फार्मसीसाठीचा अभ्यासक्रम , परीक्षेचे स्वरूप व प्रश्न पत्रिकेची रचना पालक व विद्यार्थी यांना सोप्या व समज पूर्वक मांडणीने स्पष्ट केली. महाविद्यालयात राबिवण्यात येणाऱ्या उल्लेखनीय उपक्रमांची तसेच अभ्यासक्रमाबरोबर इतर राष्ट्रीय सेवा, योजना, युवा महोत्सव, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ,नोकरीचा संधी इत्यादी उपयुक्त उपक्रमबद्दल माहिती देवून विद्यार्थी व पालक यांचे मार्गदर्शन केले. त्यामुळे पालक व विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी बी. जी. बोराडे यांनी शिक्षक, पालक व विध्यार्थी यांच्या ज्ञानात भर घालून विद्यार्थ्यांसाठी देश- विदेशातील फार्मसी क्षेत्रातील विविध संधीबद्दल मार्गदर्शन केले. तसेच विकास अधिकारी डॉ. एस. एच . दाभोळे यांनी फार्मसी क्षेत्र आय टी मध्ये कसे विस्तारले आहे त्यांचे स्वरूप सांगून पालक आणि विदयार्ध्यांच्या शंकांचे निरसन केले. विदयार्ध्यानी फक्त पुस्तकी ज्ञान न घेता संशोधनाकडे वाटचाल करावी असे आव्हान केले.
द्वितीय सत्रात फ्रेशर्स पार्टीचे आयोजन केले ,या कार्यक्रमात फॅशन शो, सांस्कृतिक नृत्य, गायन, समूह नृत्य अशा स्पर्धा झाल्या आणि ‘मिस्टर फ्रेशर’ आणि ‘मिस फ्रेशर’ स्पर्धेला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. ज्यात ‘मिस्टर आणि मिस फ्रेशर’ विजेत्यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्राचार्य डॉ. आर. बी. कुंभार सर, प्रा. योगेश कोळेकर, प्रा. प्रज्ञा घरपणकर , प्रा. काजल मोहिते, प्रा. भक्ती वाली, व दितीय वर्ष डी व बी फार्मसी विद्यार्धी यांचे सहकार्याने कार्यक्रमाचे नियोजन आखले गेले. कार्यक्रमाचे शेवटी प्रा. काजल मोहिते यांनी आभार मानले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रज्ञा घरपणकर यांनी केले. यावेळी विद्यार्धी , पालक, शिक्षक व मान्यवर अपस्थित होते.