2 second read
0
0
29

no images were found

इत्ती सी खुशी मालिकेत माधवी भोसलेच्या भूमिकेत दिसणार अभिनेत्री उत्कर्षा नाईक

 

कौटुंबिक नात्यांचे हृदयस्पर्शी चित्रण करणारी सोनी सबवरील ‘इत्ती सी खुशी’ ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली आहे. या मालिकेत अन्विता (सुंबुल तौकीर खान) या तरुण मुलीची कहाणी आहे, जिने आपले आयुष्य अनेक अडचणींमधून मार्ग काढून आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी समर्पित केले आहे. आपल्या वडिलांच्या (सुहास- वरुण बडोला) व्यसनापासून ते आपला प्रियकर विराट (रजत वर्मा) आणि बालपणीचा मित्र संजय (ऋषी सक्सेना) यांच्याशी असलेल्या आपल्या नात्यापर्यंत तिचा झगडा सुरू आहे.

 

या मालिकेत आता अन्विताचा बालपणीचा मित्र संजय भोसले याच्या आईच्या, माधवी भोसले या व्यक्तिरेखेच्या रूपात उत्कर्षा नाईक या कसलेल्या अभिनेत्रीची एंट्री होत आहे. माधवी भोसले एक ठरेल, शिस्तप्रिय आणि परंपरांचा मान राखणारी शिक्षिका आहे. तिच्या या मौन ताकदीमधूनच तिच्या मुलाची जडणघडण झाली आहे. सिंगल मदर म्हणून तिने आपल्या मुलाला वाढवले आहे. तिला मूल्यांची चाड आहे आणि जीवनाकडे बघण्याचा सकस दृष्टिकोन आहे. माधवीच्या आगमनामुळे मालिकेच्या विश्वात आणखी सखोलता आणि मोहकता येईल.

 

या मालिकेत दाखल होण्याचा आपला अनुभव शेअर करताना उत्कर्षा नाईक म्हणते, “‘इत्ती सी खुशी’ मालिकेचा भाग होताना मला खूप आनंद होत आहे. या मालिकेत नाती आणि भावना यांचे सुंदर चित्रण आहे. मी जेव्हा या व्यक्तिरेखेची रूपरेषा वाचली, तेव्हा ती मला लगेच आपलीशी वाटली. माधवीने मूल्ये जपली आहेत. असे असले तरी तिच्याकडून अनपेक्षित विनोद निर्मिती होते. ती शिस्तप्रिय, पारंपरिक वळणाची आहे. तिच्यात भावनांचे अनेक पदर आहेत. आपल्या मुलावर ती ज्या प्रामाणिकतेने प्रेम करते, ते मला फार आवडले. तिच्यात एक मौन ताकद आहे, जी भडक नाही, पण ती जाणवते. मला वाटते, प्रेक्षकांना तिची उपस्थिती आवडेल आणि तिच्यामध्ये त्यांना आपल्या आईच्या, मावशीच्या, आत्याच्या किंवा शिक्षिकेच्या छटा दिसतील.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मधुगंधा कुलकर्णी, निपुण धर्माधिकारी यांचे लेखन व दिग्दर्शन आणि स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर यांचा अभिनय असलेल्या“लग्नपंचमी”ला प्रचंड प्रतिसाद

मधुगंधा कुलकर्णी, निपुण धर्माधिकारी यांचे लेखन व दिग्दर्शन आणि स्वप्नील जोशी, अमृता खानविल…