no images were found
भारतीय संविधानातील विशेष तरतुदी: ‘संविधान जागर’अंतर्गत डॉ. प्रकाश पवार यांचे विशेष व्याख्यान
कोल्हापूर (प्रतिनिधी):भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र आणि जनसंपर्क कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संविधान जागर’ ही वार्षिक व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे. २६ ऑगस्ट २०२५ पासून दर महिन्याच्या २६ तारखेला सकाळी ११ वाजता सदर व्याख्यानमालेअंतर्गत तज्ज्ञ अभ्यासक, विचारवंत यांचे व्याख्यान शिवाजी विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ या युट्यूब वाहिनीद्वारे ऑनलाईन स्वरुपात प्रसारित करण्यात येत आहे. ‘संविधान जागर’ व्याख्यानमालेअंतर्गत दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी चौथे पुष्प गुंफताहेत शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागातील प्राध्यापक तथा ज्येष्ठ राजकीय विचारवंत डॉ. प्रकाश पवार. त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे- “भारतीय संविधानातील विशेष तरतुदी”.येत्या बुधवारी (दि. २६) संविधान दिनी हे व्याख्यान ऐकण्याकरिता पुढील लिंकवर सकाळी ११ वाजता उपस्थित राहावे.