Home मनोरंजन आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या निमित्ताने सोनी सबवरील अभिनेते बोलत आहेत बदलत्या पुरुषत्वाविषयी

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या निमित्ताने सोनी सबवरील अभिनेते बोलत आहेत बदलत्या पुरुषत्वाविषयी

8 second read
0
0
38

no images were found

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या निमित्ताने सोनी सबवरील अभिनेते बोलत आहेत बदलत्या पुरुषत्वाविषयी

जगभरात 19 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आधुनिक पौरुषाविषयीची चर्चा करणे संबद्ध आहे. पुरुषांचा हळवेपणा, भावनिक बुद्धिमत्ता आणि करुणा यांचे चित्रण करून टेलिव्हिजन पौरुषाच्या बदलत्या कल्पना प्रतिबिंबित करतो. यावर्षी सोनी सबवरील प्रतिभावान अभिनेते सांगत आहेत की कशा त्यांच्या भूमिका अधिक वास्तववादी, संबद्ध आहेत आणि आजच्या पुरुषाला समजून घेण्यासाठीची समज वाढवणाऱ्या आहेत.

     ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत राजवीर शास्त्रीची भूमिका करणारा गौरव चोप्रा म्हणतो, “आंतरराष्ट्रीय पुरुष दिनी माझ्या मनात नेहमी अशा पुरुषांचा विचार येतो, जे शांतपणे स्वतःला पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मी माझी व्यक्तिरेखा राजवीरचा विचार करतो कधीकाळी यशस्वी असलेला हा माणूस एका दुःखद भूतकाळानंतर पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे. आपले दुखावलेपण लपवण्यासाठी तो क्रोधाचा मुखवटा घालतो, कारण त्याला अन्य मार्ग माहीत नाही. त्याची भूमिका करत असताना माझ्या मनात हा विचार आला की, प्रत्यक्ष जीवनातही किती पुरुष असे करत असतील? मी या भूमिकेतून शिकलो की बरे होणे ही काही कमजोरी नाही. उलट, आपल्या वेदनेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करणे हे खूप हिंमतीचे काम आहे.”

       ‘इत्ती सी खुशी’ मालिकेत विराटची भूमिका करणारा रजत वर्मा म्हणतो, “लहानाचा मोठा होत असताना मी आपले प्रेम सौम्यपणे व्यक्त करणारे, कुणीही न सांगता गोष्टी ठीकठाक करणारे, थाटमाट न करणारे पुरुष पाहिले आहेत. मी साकारत असलेला विराट देखील त्याच पठडीतील आहे, ज्याच्याकडे एक सौम्य ताकद आहे. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनी, माझ्या मनात अशा पुरुषांचा विचार येतो, जे ढोबळ साचेबंद पुरुषांच्या व्याख्येत बसत नाहीत, पण ते संयम, सहानुभूती ठेवून आणि स्थिर राहून जीवन जगतात. विराटची भूमिका करताना मला हे जाणवते की कधीकधी जी सौम्य स्वरूपाची ताकद असते तीच चिरकाल टिकून राहते.”

    इत्ती सी खुशी’ मालिकेत संजय भोसलेची भूमिका करणारा ऋषी सक्सेना म्हणतो, “माझ्या आयुष्यात मी गुरु, कुटुंबातील सदस्य, सहकारी वगैरे विविध रूपातील अशा पुरुषांना भेटलो आहे, ज्यांनी मला हे दाखवून दिले की, जबाबदारी आणि आपलेपणा एकत्र नांदू शकतात. मी साकारत असलेल्या संजयच्या पत्रात देखील हा समतोल आहे. त्याच्याकडे अधिकार आहे, पण त्याच्यासोबत एक सखोल भावनिक प्रामाणिकपणा देखील आहे. या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनी, मला पुन्हा या गोष्टीचे स्मरण होत आहे की, पुरुषांनी शक्ती आणि संवेदनशीलता या दोन्हीमधून एकाची निवड करणे आवश्यक नाही. कारण हे दोन्ही गुण एकत्र असू शकतात आणि बऱ्याच जणांच्या ठायी ते दिसतात देखील.”

     ‘गाथा शिव परिवार की – गणेश कार्तिकेय’ मालिकेत इंद्र देवाची भूमिका करणारा अभिनेता करण सूचक म्हणतो, “पौराणिक पात्रे पडद्यावर साकारताना मी हे शिकलो आहे की, ताकद क्वचितच एक-आयामी असते. इंद्र देवाची भूमिका करताना देखील मी अभिमान, हळवेपणा, अनिश्चितता या गोष्टी अनुभवल्या आहेत. या भावना पुरुषांच्या अनुभवास येतात, हेच आपण विसरतो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनी, मला वाटते की, पुरुषांना या सर्व भावना अनुभवण्याची मुभा असणे महत्त्वाचे आहे. या भूमिकेतून मी हाच धडा घेतला आहे की, आपण अचूक असल्याचे नाटक करण्यापेक्षा खरेपणा अधिक शक्तीशाली असतो.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…