Home आरोग्य महापालिकेच्यावतीने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यां व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई

महापालिकेच्यावतीने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यां व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई

8 second read
0
0
29

no images were found

महापालिकेच्यावतीने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यां व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई

महालक्ष्मी इडली सेंटरला एक हजार तर बालाजी गार्डन सांस्कृतिक हॉलला दहा हजार रुपये दंड

कोल्हापूर ( प्रतिनिधी ): शहरातील स्वच्छतेस बाधा आणणारा कचरा उघड्यावर टाकणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिकेच्या पथकामार्फत दंडात्मक कारवाई सुरू आहे. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालया समोरील महालक्ष्मी इडली सेंटरनी उघड्यावर कचरा टाकल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना रु.1000/- चा दंड तसेच ताराबाई पार्क येथील बालाजी गार्डन सांस्कृतिक हॉल यांनी बेकायदेशीर रित्या अन्न खरकटे व प्लास्टिक बॉटल्स ड्रेनेज लाईनला सोडले असल्याचे निदर्शनास आल्यामुळे या परिसरात महापालिकेची ड्रेनेज लाईन वारंवार चोकअप होणेसंबधी तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामुळे बालाजी गार्डन सांस्कृतिक हॉल यांना रुपये १०,०००/- रुपयांचा दंड करण्यात आला. तसेच अशा व्यावसायिकांना कचरा उघड्यावर न टाकण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या.

            सदरची कारवाई सहा.आयुक्त कृष्णा पाटील, विभागीय आरोग्य निरीक्षक विकास भोसले, आरोग्य निरिक्षक गीता लखन व कर्मचारी यांनी केली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…