Home आरोग्य डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटल ने नेत्रसेवांचा विस्तार करण्यासाठी कोल्हापूर येथे नवीन हॉस्पिटल सुरू

डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटल ने नेत्रसेवांचा विस्तार करण्यासाठी कोल्हापूर येथे नवीन हॉस्पिटल सुरू

15 second read
0
0
63

no images were found

डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटल ने नेत्रसेवांचा विस्तार करण्यासाठी कोल्हापूर येथे नवीन हॉस्पिटल सुरू

•नवीन अत्याधुनिक हॉस्पिटलमधे डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांसाठी डायग्नोस्टिक्स, शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रियेनंतरची काळजी उपलब्ध 

•नवे केंद्र सुरू झाल्याप्रित्यर्थ हॉस्पिटलद्वारे सर्व वयोगटांसाठी ३० नोव्हेंबर२०२५ पर्यंत मोफत सल्लासेवा

•मोफत नेत्र तपासणीसाठी नाव नोंदणी करण्यासाठी रुग्णांना ८९२५५०७१९९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करता येईल. 

कोल्हापूर, (प्रतिनिधी): डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटल या भारतातील आघाडीच्या आयकेयर पुरवठादार कंपनीने पश्चिम महाराष्ट्रात नेत्रसेवांचा विस्तार करण्यासाठी कोल्हापूर येथे नवे हॉस्पिटल सुरू केले आहे. या अत्याधुनिक केंद्रामध्ये सर्वोत्तम पायाभूत सुविधा, आधुनिक सोयी देण्यात आल्या असून त्यावरून हॉस्पिटलची स्थानिक नागरिकांना त्यांच्या घराजवळ नेत्रसेवा देण्याची बांधिलकी दिसून येते. उद्घाटन समारंभासाठी नामवंत नेत्रतज्ञ्ज उपस्थित होते. त्यात डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलचे युनिट असलेल्या सरवटे आय क्लिनिकच्या क्लिनिकल सर्व्हिसेसचे प्रमुख डॉ. जयंत सरवटे, अंकुर हॉस्पिटलमधील क्लिनिकल सर्व्हिसेसचे प्रमुख डॉ. सदानंद पाटणे, आणि हॉस्पिटल्सचे नेतृत्व हाताळणारे प्रमुख ऑपरेटिंग ऑफिसर श्री. राहुल अगरवाल आणि प्रमुख स्ट्रेटेजी ऑफिसर डॉ. वंदना जैन यांचा समावेश होता. 

        ताराराणी चौकात ५,४३० चौरस फुटांच्या जागेत वसलेले हे प्रशस्त हॉस्पिटल कोल्हापूरमधील सर्वात मोठे आयकेयर सुविधा केंद्र असून तिथे प्रभावी निदानसेवा आणि उपचार केले जातात. हॉस्पिटलद्वारे आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने नेत्रसेवा दिली जाते व त्यात मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, कॅटॅरॅक्ट, ग्लुकोमा, रेटिनल आजार, डायबेटिक रेटिनोपॅथी, पेडिअट्रिक, कॉर्नियल केयरसाठी स्पेशलाइज्ड युनिट्स तसेच ऑन- साइट ऑप्टिकल व फार्मसी यांचा समावेश आहे. या नवीन सुविधेमार्फत दरवर्षी १५,०००+ रुग्णांना सेवा मिळण्याची अपेक्षा आहे. लाँचच्या निमित्ताने हॉस्पिटलद्वारे ३० सर्व वयोगटांसाठी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत मोफत सल्लासेवा दिली जाणार असून मोफत नेत्र तपासणीसाठी नाव नोंदणी करण्यासाठी रुग्णांना ८९२५५०७१९९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करता येईल.  

        डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलचे प्रमुख ऑपरेटिंग ऑफिसर श्री. राहुल अगरवाल म्हणाले, ‘नव्या केंद्रात कुशल पॅरामेडिकल आणि नॉन- पॅरामेडिकल कर्मचारी व सर्व प्रकारच्या नेत्रसेवा देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान सज्ज ठेवण्यात आले आहे. टीम आणि या केंद्राद्वारे अत्याधुनिक उपचार उदा. कॅटॅरॅक्ट, लेसिक, रेटिना, कॉर्निया आणि रिफ्रॅक्टिव्ह कंडिशन्स यांचा समावेश आहे. या हॉस्पिटलच्या लाँचसह आम्ही भारतातील इतर २५०+ केंद्रांसह जागतिक दर्जाची, विश्वासार्ह सेवा पुरवण्यासाठी उत्सुक आहोत.’

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …