no images were found
“गरबा मला फारच आवडतो आणि गरबा शिकण्याचा मी कसून प्रयत्न करते”: आशी सिंह
सोनी सबवरील ‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ ही मालिका प्रेक्षकांसमोर प्रेम, भावना आणि नात्यांची एक ताजी टवटवीत गोष्ट घेऊन आली आहे. या मालिकेत आशी सिंह कैरी शर्माची भूमिका करत आहे. कैरी एक उत्साही, संवेदनशील आणि आजच्या जमान्याची तरुणी आहे. तिच्या आयुष्यात प्रेमाची गुंतागुंत आहे, पण त्याचबरोबर दैनंदिन जीवनातील साधेपणा आणि मोहकता दिसते. आपल्या अभिनय कौशल्याने आशीने कैरीची भूमिका जिवंत केली आहे. कैरी एक अशी व्यक्तिरेखा बनली आहे, जी प्रेक्षकांना चटकन आपलीशी वाटते.
सध्या सर्वत्र नवरात्रीचा आनंदोत्सव सुरू आहे. आशी सिंह सांगत आहे, या पर्वाचे तिच्या आयुष्यात काय महत्त्व आहे. या आनंदसोहळ्याशी ती कशा प्रकारे संलग्न आहे, हे ती सांगते. तिच्या साठी, नवरात्रीचा उत्सव म्हणजे तिचे मूळ आणि जिवंत परंपरांचा सुंदर सुमेळ आहे.
नवरात्रीच्या आनंदोत्सवाविषयी आशी म्हणते, “मी उत्तर भारतातून आले आहे आणि तिकडे नवरात्रीचा संबंध देवीच्या ‘जगराता’शी, देवीच्या पूजेशी आणि तत्सम विधींशी आहे. पण मला पहिल्यापासून गरबा आणि दांडियाचे खूप आकर्षण होते. मी मुंबईत आल्यानंतर गरबा शिकण्यासाठी मी खूप परिश्रम घेतले. मी अजूनही गरबा शिकतेच आहे, कारण वर्षातून फक्त नऊ दिवस गरबा केला जातो. त्यामुळे ते शिकणे तितकेसे सोपे नाही. नवरात्रीत मुंबईचे वातावरण अद्भुत असते. आसपास पाहिले की, सगळ्या लोकांनी एकाच रंगाचे कपडे घातलेले दिसतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांचे ठराविक नऊ रंग सर्वजण पाळतात. मला ही संकल्पना आवडते. देवीची पूजा आणि उपवास मी पहिल्यापासून करत आले आहे. संध्याकाळी मी माझ्या कुटुंबासमवेत, कधी कधी मित्र-मैत्रिणींसोबत गरबा ग्राउंडवर जाते, गरबा खेळायला किंवा गरबा बघायला! ते वातावरणच इतके उत्फुल्ल आणि सळसळते असते!”