no images were found
तुमचा दिवस योग्य प्रकारे सुरू करा: कॅलिफोर्निया बदामांसह जागतिक हृदयदिन साजरा करा
भारत, : यंदा जागतिक हृदयदिनाची थीम आहे “डोन्टमिस अबीट” – एक प्रभावी स्मरण की हृदयविकारामुळे अनेकजीव अकाली गमावलेजात आहेत, जे कुटुंबांपासून अमूल्यवेळ हिरावून घेत आहे. ही सूचना भारतासाठी विशेषतः गंभीर आहे, कारण येथे हृदयविकारांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत आहे. लॅन्सेटच्या “भारतातील राज्यांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचे बदलते स्वरूप आणि त्यांचे जोखीम घटक ” याअभ्यासानुसार, भारतीयांना हृदयविकार इतर देशांतील लोकांपेक्षा सरासरी दहावर्षांनी आधी होतात. वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या मते, महिलांना पहिला हृदयविकाराचा झटका अधिक तीव्र असतो आणि त्यामधून मृत्यूचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असते. तसेच, तरुणांमध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये अभूतपूर्व वाढ होत आहे. हृदयविकार टाळण्यासाठी एक साधा पण परिणामकारक उपाय म्हणजे हृदयासाठी फायदेशीर जीवनशैली स्वीकारणे – उदाहरणार्थ, दररोजच्या आहारात कॅलिफोर्निया बदामांचा समावेश करणे.
२०० हून अधिक प्रकाशित अभ्यासांमधून सिद्ध झाले आहे की कॅलिफोर्निया बदामांमुळे आरोग्याला विविध फायदे होतात. हे बदाम १५ अत्यावश्यक पोषणद्रव्यांनी समृद्ध आहेत – ज्यामध्ये हृदयासाठी उपयुक्त असलेले मोनो अनसॅच्युरेटेडफॅट्स, व्हिटॅमिनई, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आणि आहारातील तंतुमयघटक (डायटरीफायबर) यांचा समावेश आहे. नियमित बदाम सेवनामुळे एकूणकोलेस्टेरॉल व LDL (वाईट) कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. तसेच, हृदयविकारांशी संबंधित जळजळ (इन्फ्लेमेशन) सूचक घटक देखील कमी होतात.
पोषण व आरोग्यसल्लागार शीला कृष्णस्वामी यांनी सांगितले असे “भारतामध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्यामुळे, केवळ कोलेस्ट्रॉल कमी करणे पुरेसे नाही, तर हृदयाच्या एकूण आरोग्यावर सकारात्मक परिणाम करणाऱ्या आहारावर भर देणे आवश्यक आहे. बदाम हे आरोग्यासाठी उपयुक्त असणारे घटकांनी समृद्ध आहेत — जसे की चांगल्याप्रकारचे मेद, तंतूमयघटक, अँटीऑक्सिडंट्स, तसेच जीवनावश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे. हे घटक शरीरातील दाह कमी करण्यास, तसेच हृदयाचे कार्य सुधारण्यास मदत करतात. कॅलिफोर्नियातील बदामांचा सकाळी समावेश केल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते आणि हृदय निरोगी राहते. याशिवाय, यामुळे उर्जा टिकून राहते आणि एकूणच आरोग्यसुधारते.”