Home सामाजिक समाज माध्यमांनी भाषेला समृद्ध बनवले : डॉ. प्रतिभा मुदलियार

समाज माध्यमांनी भाषेला समृद्ध बनवले : डॉ. प्रतिभा मुदलियार

2 second read
0
0
60

no images were found

समाज माध्यमांनी भाषेला समृद्ध बनवले : डॉ. प्रतिभा मुदलियार

कोल्हापूर,(प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी बहुभाषिक होऊन स्वतःच्या उन्नतीसाठी भाषेचा वापर केला पाहिजे. समाजमाध्यमांनी भाषेच्या समृद्धीमध्ये महत्त्वाचा वाटा उचलला आहे, असे प्रतिपादन मैसूर विद्यापीठाच्या डॉ. प्रतिभा मुदलियार यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचा हिंदी अधिविभाग व यूको बँकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदी पखवाड्यामध्ये डॉ. मुदलियार यांचे ‘मीडिया और हिंदी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी अधिविभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी होत्या.

यावेळी डॉ. मुदलियार यांनी सांगितले की, भाषेचे मानवी विकासामध्ये महत्वपूर्ण स्थान आहे. विद्यार्थ्यांनी भाषिक वादात न अडकता बहुभाषिक बनले पाहिजे. भारत व विदेशात वापरल्या जाणाऱ्या हिंदी भाषेचे स्वरूप, दक्षिण कोरियात हिंदी भाषेचे अध्यापन करत असताना आलेले अनुभव, हिंदी भाषेचे जागतिक पातळीवरील स्थान, समाज माध्यमांमध्ये प्रयोगात येणारी भाषा, हिंदी च्या प्रचार-प्रसारामध्ये समाज माध्यमांची भूमिका यांची माहिती देतानाच समाज माध्यमांनी भाषेला समृद्ध बनवण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली.

डॉ. करेकट्टी यांनीही यावेळी आपला इथियोपिया देशातील हिंदी भाषेचा अनुभव सांगितला. भाषा फक्त विचारांच्या आदान-प्रदानाचे साधन नसून मानवी समुदायाची महत्वपूर्ण गरज असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. जयसिंग कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. प्रकाश निकम यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी डॉ. संतोष कोळेकर, डॉ. सुषमा चौगले, डॉ. अक्षय भोसले, डॉ. प्रकाश मुंज, डॉ. गीता दोडमणी, प्रतीक्षा ठुंबरे तसेच संशोधक विद्यार्थी, एम. ए. हिंदी व भाषा प्रौद्योगिकी भाग 1 व 2 चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश कांबळे यांनी केले तर श्रीकांत देसाई यांनी आभार मानले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…