Home मनोरंजन कलाकार सांगत आहेत त्यांच्या गणेश चतुर्थीशी संबंधित परंपरा आणि खाद्यपदार्थांविषयी  

कलाकार सांगत आहेत त्यांच्या गणेश चतुर्थीशी संबंधित परंपरा आणि खाद्यपदार्थांविषयी  

18 second read
0
0
64

no images were found

कलाकार सांगत आहेत त्यांच्या गणेश चतुर्थीशी संबंधित परंपरा आणि खाद्यपदार्थांविषयी

 

मुंबई, : गणेश चतुर्थी जवळ आली आहे आणि वातावरण ढोल-ताशाच्या नादाने दुमदुमले आहे. सुग्रास मोदकांचा सुगंध आता लवकरच त्यात मिसळेल आणि घरोघरी बाप्पाचे आगमन होईल. सोनी सबवरील लोकप्रिय कलाकार ऋषी सक्सेना, गौरी टोंक, आशी सिंह, अभिषेक वर्मा आणि गरिमा परिहार या सणाशी निगडीत आपल्या सुंदर आठवणी शेअर करत आहेत तसेच आपण हा सण कसा साजरा करतो आणि या मंगल पर्वाचे आपल्या आयुष्यात काय स्थान आहे हे सांगत आहेत. बाप्पाला भक्तीभावाने, वाजत-गाजत घरी घेऊन येण्यापासून ते मखर बनवणे, छान छान प्रसादाचा आनंद अनुभवणे वगैरे गोष्टी आपल्या अंतःकरणाच्या किती जवळ आहेत हे जाणून घ्या त्यांच्याकडूनच.

‘इत्ती सी खुशी’ मालिकेत संजयची भूमिका करत असलेला ऋषी सक्सेना म्हणतो, ‘इत्ती सी खुशी’ मालिकेत संजयची भूमिका करत असलेला ऋषी सक्सेना म्हणतो, “गणेश चतुर्थी हा माझ्यासाठी वर्षातील खूप आवडता काळ असतो, कारण माझ्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्याची तो सुंदर सांगड घालतो. मी माझ्या पद्धतीने या सोहळ्यात सहभागी होतो. आमच्यासाठी ज्या गोष्टीशिवाय ह्या सणाला पूर्णत्व लाभत नाही, ती गोष्ट म्हणजे उकडीचे मोदक. महाराष्ट्रातील गणेश चतुर्थीविषयी मला आवडणारी गोष्ट म्हणजे समस्त समुदाय उत्साहाने, भक्तीभावाने आणि सांस्कृतिक अभिमानाच्या भावनेने एकत्र येतो. एकीकडे संगीत, ढोल-ताशा आणि नृत्य असते, तर दुसरीकडे या सणाची एक सखोल आध्यात्मिक बाजू देखील आहे.”

 ‘इत्ती सी खुशी’ मालिकेत नंदिताची भूमिका करणारी गौरी टोंक म्हणते, “बाप्पाच्या आगमनाची तयारी करण्यापासून म्हणजे साफसफाई करून निवडक फुलांनी मखरीची सजावट करणे, चमकदार कापडाने मंडप उभारणे वगैरे बाप्पाच्या सगळ्याच गोष्टी मला फार आवडतात. घरी आम्ही पारंपरिक आणि आधुनिक मिठाई देखील बनवतो. या सगळ्यात मोदक भाव खातात ही गोष्ट वेगळी, पण मोदकांव्यतिरिक्त आम्ही पुरणपोळी, खीर आणि चकली देखील बनवतो. घरातले सगळे या पदार्थांची आतुरतेने वाट बघत असतात. सगळ्यात मस्त गोष्ट म्हणजे समस्त घर उत्साहाने सळसळत असते- पाहुणे, मित्रमंडळी, शेजारी-पाजारी यांचे येणे-जाणे सुरू असते. संगीत, गप्पा, हास्य-विनोद यांना उधाण येते. आपले आयुष्य कितीही व्यस्त झाले, तरी गणपती बाप्पाच्या आगमनाने आपण जरा स्थिरावतो, आपल्या प्रिय-जनांसोबत आनंदात वेळ व्यतीत करतो आणि कृतज्ञ भावनेने बाप्पाची पूजा करतो.”

 ‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेत कैरीची भूमिका करणारी आशी सिंह म्हणते, “आम्ही तीन दिवसांसाठी गणपती स्थापना करून सुरुवात केली होती. पण तीन दिवस कमी वाटू लागल्याने आता आमच्याकडे पाच दिवस गणपती असतात. त्यासाठीची तयारी खूप आधीपासून सुरू होते. सजावट कशी करायची इथपासून ते पाच दिवस काय काय खाद्यपदार्थ करायचे हे ठरवले जाते. सगळे कुटुंबीय उत्साहाने त्यात सहभागी होतात. दररोज काही तरी खास पदार्थ केला जातो. देवाच्या नैवेद्यासाठी रोज नवीन पदार्थ असेल याची काळजी आम्ही घेतो. मला जर शूटिंग नसेल आणि मी मोकळी असेन, तर मला स्वतःलाच प्रसाद बनवायला आवडते. या सोहळ्यात ते माझे योगदान असते. यावर्षी मला विशेष उत्साह वाटत आहे, कारण ‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेचा परिवार या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आमच्याकडे येणार आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाने घर आनंदाने, हास्याने आणि एका वेगळ्याच ऊर्जेने भरून जाते.”

 ‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेत शौर्यची भूमिका करणारा अभिषेक वर्मा म्हणतो, “गणेश चतुर्थी एक असे पर्व असते, जेव्हा शहरातील कोपरा न कोपरा जिवंत होतो. गणपती म्हणजे केवळ धार्मिक विधी नाही, तर हास्य, संगीत आणि प्रसादाचे वाटप. रस्ते सुशोभित करण्यात येतात, वातावरण रंगीत आणि प्रसन्न होऊन जाते. विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी व्हायला मला फार आवडते. ‘गणपती बाप्पा मोरया’ हा गजर करण्यात शब्दातीत आनंद असतो. खाद्य पदार्थांविषयी सांगायचे, तर नारळीपाक आणि लाडू मला फार आवडतात. एकदा प्रसादाचे वाटप झाल्यानंतर मी आवर्जून दुसऱ्यांदाही प्रसाद घेतोच!”

 पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत दीप्ती परीखची भूमिका करणारी गरिमा परिहार म्हणते, “माझ्यासाठी गणेश चतुर्थी म्हणजे रंग, आनंद आणि उत्साहाने भरलेले घर. हा सण वातावरणाचा जणू कायापालट करतो. वातावरणात संगीत लहरी लहरतात, मोदकांचा दरवळ सर्वत्र पसरतो आणि प्रिय जनांचा सहवास लाभतो. यावर्षी, बाप्पाचे स्वागत मी अधिकच उत्साहाने करणार आहे. मला हवे ते सगळे त्याच्याकडे मागणार आहे, आणि त्याने जे दिले आहे, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार आहे.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…