Home मनोरंजन आगामी लपंडाव मालिकेत अभिनेता चेतन वडनेरे दिसणार ड्रायव्हरच्या भूमिकेत?

आगामी लपंडाव मालिकेत अभिनेता चेतन वडनेरे दिसणार ड्रायव्हरच्या भूमिकेत?

3 second read
0
0
46

no images were found

आगामी लपंडाव मालिकेत अभिनेता चेतन वडनेरे दिसणार ड्रायव्हरच्या भूमिकेत?

 

स्टार प्रवाहच्या ठिपक्यांची रांगोळी मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता चेतन वडनेरे एका छोट्या ब्रेकनंतर प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालाय. स्टार प्रवाहवर लवकरच सुरु होणाऱ्या लपंडाव मालिकेत चेतन चक्क ड्रायव्हरच्या रुपात दिसणार आहे. याआधी ठिपक्यांची रांगोळी मालिकेत त्याने साकारलेलं शशांक हे पात्र खूप संयमित आणि शिस्तबद्ध होतं. लपंडाव मालिकेत तो साकारत असलेली कान्हा ही व्यक्तिरेखा शशांकच्या अगदी विरोधी आहे. कान्हा अत्यंत हुशार, मितभाषी पण तितकाच जुगाडू आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते हेच त्याचं ब्रीदवाक्य आहे. त्याला लोकांची चांगली पारख आहे. त्याचे आडाखे सहसा चुकत नाहीत. त्याचं बोलणं इतकं लाघवी आणि कल्पक असतं की दुसऱ्या मिनिटाला समोरची व्यक्ती त्याच्या प्रेमात पडलेली असते. कान्हाला खोटं बोलणं वर्ज्य नाहीय. ज्या खोट्याने कुणाचं नुकसान होणार नसेल, उलट एखाद्याचं भलंच होणार असेल असं खोटं शरीराला पोषक असतं असं कान्हाचं म्हणणं आहे. तो कुठलाही निर्णय घेताना मनाइतकाच बुद्धीलाही प्राधान्य देतो. कान्हाच्या आय़ुष्यात एक ध्येय आहे आणि ते गाठण्यासाठी जर त्याला लग्न करावं लागणार असेल तर तेही त्याला वर्ज्य नाहीय. सखीसोबत लग्नाचा घेतलेला निर्णय याच ध्येयपूर्तीच्या दिशेने पहिलं पाऊल आहे असं म्हण्टलं तर चुकीचं ठरणार नाही. आता हे ध्येय नेमकं काय आहे हे लवकरच मालिकेतून उलगडेल.

कान्हा या भूमिकेविषयी सांगताना चेतन म्हणाला, ‘पुन्हा एकदा स्टार प्रवाह परिवारात सामील होताना आनंद होतोय. बरेच प्रेक्षक मला ठिपक्यांची रांगोळी मालिकेतला शशांक उर्फ खडूस म्हणून ओळखतात. पण आराधना आणि लेक माझी लाडकी या स्टार प्रवाहच्या मालिकांमधून मी छोट्या-मोठ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलो होतो. लपंडाव मालिकेत मी साकारत असलेल्या कान्हा या पात्राला बरेच कंगोरे आहेत. प्ले विदिन अ प्ले अर्थात नाटकात नाट्य या प्रकारातलं हे पात्र आहे जे साकारणं आव्हानात्मक आहेच पण त्यात मजाही तेवढीच येणार आहे. मी नट म्हणून खूप नशीबवान आहे की आधी साकारलेल्या पात्राच्या अगदी दुसऱ्या टोकाची भूमिका साकारण्याची संधी मला मिळते आहे आणि ती सुद्धा स्टार प्रवाह वाहिनीवरच ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हा नक्की पहा आमची नवी मालिका लपंडाव लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.’

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…