no images were found
तेनाली रामा’ मालिकेत तेनाली हिप्नॉसिसचे रहस्य उलगडून एकापाठोपाठ एक झालेल्या आत्महत्यांचा छडा लावणार
सोनी सबवरील ‘तेनाली रामा’ मालिकेने तेनाली रामा (कृष्ण भारद्वाज) या महान दरबारी कवी आणि अत्यंत मुत्सद्दी रणनीतीकर्त्याच्या सुरस कथा सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. अलीकडच्या भागांमध्ये, तेनाली पवित्र राजदंडाच्या चोरीमागचे कारस्थान उघड करतो, राज्य पुट्टी (अजित झा) च्या भोंदुपणाचे पितळ उघडे पाडतो आणि कृष्णदेवराय (आदित्य रेडिज) राजाला हे समजावून देतो की राजेपद हे विनम्रतेत असते, संकेतांमध्ये नाही!
आगामी भागांमध्ये, एकामागून एक आत्महत्येच्या घटना घडतात, ज्यांच्यामुळे विजयनगर साम्राज्य हादरून जाते. या प्रत्येक घटनेत मरणारी व्यक्ती मरता मरता काही ठराविक शब्द पुटपुटते. याच्यामागे काही तरी जादूटोणा असल्याची शंका तेनालीच्या मनात येते, पण त्यातील हिप्नॉसिसचे संकेत त्याच्या लक्षात येतात. तो हिप्नॉटिस्ट चंद्रकला (पियाली मुन्शी)ची मदत घेतो. तिचे म्हणणे असते की, तिचा एक दुष्ट स्वभावाचा शिष्य या मृत्युंच्या मुळाशी आहे. या प्रकरणाचा छडा लावत लावत तेनाली बेल्लारीत जाऊन पोहोचतो. येथे एक काव्य गायन आणि एक संदिग्ध कवी विरुपाक्ष (विपिन शर्मा) यांच्याकडे तेनालीला अपेक्षित ते उत्तर असते. रहस्याचा एक एक पदर सोडवता सोडवता, रामाला छडा लागतो की, विरुपाक्षची पत्नी शर्वणी (दीपाली सैनी) यामध्ये गोवलेली आहे. पण अचानक तिचा मृत्यू होतो आणि त्यामुळे गुंता वाढतो. चंद्रकलाची नेमणूक रॉयल माइंड कोच म्हणून करण्यात येते आणि दरबारावरील तिचा प्रभाव वाढतो, तेव्हा रामाच्या मनात हा विचार प्रबळ होऊ लागतो की, खरा सूत्रधार सतत त्याच्या सोबतच तर नव्हता?
तेनाली रामा मालिकेत तेनालीची भूमिका करणारा कृष्ण भारद्वाज म्हणतो, “तेनाली रामा म्हणून आत्तापर्यंत जितक्या कथा केल्या, त्यातली ही एक अत्यंत थरारक कथा आहे. यामध्ये भरपूर रहस्य, अनपेक्षित कलाटण्या आणि रामा व चंद्रकला यांच्यातील मनोवैज्ञानिक लढा आहे. या गोष्टीत मला ही गोष्ट विशेष आवडली की, या गोष्टीत रामाच्या बुद्धीचातुर्याची खरी कसोटी लागली. यामध्ये केवळ रहस्य शोधून काढायचे नव्हते तर राजा आणि विजयनगर साम्राज्य यांचे रक्षण करत असताना हिप्नॉसिसच्या रहस्यांनी भरलेल्या घटनांचा सामना देखील करायचा होता.