Home शैक्षणिक अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेविषयी शनिवारी शिवाजी विद्यापीठात मार्गदर्शन सेमिनार

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेविषयी शनिवारी शिवाजी विद्यापीठात मार्गदर्शन सेमिनार

3 second read
0
0
9

no images were found

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेविषयी शनिवारी

शिवाजी विद्यापीठात मार्गदर्शन सेमिनार

 

कोल्हापूर,(प्रतिनिधी): शैक्षणिक वर्ष २०२५–२६ करिता अभियांत्रिकी पदवी (प्रथम व द्वितीय वर्ष) तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात येत्या शनिवारी (दि. २१) सकाळी १०.३० वाजता प्रवेश  प्रक्रिया मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. हा सेमिनार तंत्रज्ञान अधिविभाग सभागृहात पार पडणार आहे. ही माहिती तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. अजित कोळेकर यांनी दिली आहे.

या मार्गदर्शन चर्चासत्रात विद्यार्थी व पालकांना अभियांत्रिकी म्हणजे काय, अभ्यासक्रमाचे स्वरूप,  विविध शाखांची निवड कशी करावी, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्या अनुषंगाने होणारे बदल, भविष्यातील रोजगार व उच्च शिक्षणाच्या संधी, विविध स्कॉलरशिप, विद्यापीठाच्या विविध योजना, सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठीच्या योजना आदींविषयी समग्र मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि प्रवेश प्रक्रियेचे स्वरूप याविषयी माहिती देऊन शंकानिरसन केले जाईल.

तंत्रज्ञान अधिविभागामध्ये अभियांत्रिकीच्या विविध शाखांचे उच्चशिक्षण दिले जाते. पदवी स्तरावर कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखांचा समावेश आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी, एनर्जी टेक्नॉलॉजी, एनव्हायर्नमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी या शाखांचा समावेश आहे. अभियांत्रिकीमध्ये पी.एचडी. करण्याचीही संधी येथे उपलब्ध आहे.

या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सेमिनारचा विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी  (०२३१ ) २६०९४२४ / २६०९४१४ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. कोळेकर यांनी केले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डेटॉल फ्रेश भारतीयांना 12 तास ताजेपणा देऊन ‘नेहमीच तयार’ रहाण्यासाठी देते प्रोत्साहन

डेटॉल फ्रेश भारतीयांना 12 तास ताजेपणा देऊन ‘नेहमीच तयार’ रहाण्यासाठी देते प्रोत्साहन  …