Home मनोरंजन वीर हनुमान’ या भक्तिमय मालिकेतील पोशाख अजिंठा आणि वेरूळच्या लेण्यांमधील डिझाईन्सने प्रेरित 

वीर हनुमान’ या भक्तिमय मालिकेतील पोशाख अजिंठा आणि वेरूळच्या लेण्यांमधील डिझाईन्सने प्रेरित 

15 second read
0
0
29

no images were found

वीर हनुमान’ या भक्तिमय मालिकेतील पोशाख अजिंठा आणि वेरूळच्या लेण्यांमधील डिझाईन्सने प्रेरित 

 

 

 

सोनी सबवरील ‘वीर हनुमान’ ही आगामी पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या मनात भक्तिरस निर्माण करण्यासाठी येत आहे! या मालिकेत महाबली हनुमानाचे जीवन चरित्र उलगडून दाखवणार आहेत. ज्यात त्याच्या बाल्यावस्थेपासून स्वतःमधील दिव्य शक्ती ओळखण्यापर्यंतचा त्याचा प्रवास असेल. या मालिकेत केसरीच्या भूमिकेत आरव चौधरी, अंजनीच्या रूपात सायली साळुंखे वाली आणि सुग्रीव यांच्या दुहेरी भूमिकेत माहिर पांधी आणि बाल हनुमानाच्या भूमिकेत आन तिवारी हा बाल कलाकार दिसणार आहे. ही मालिका त्यातील दमदार कथानकाबरोबरच अवाक करणाऱ्या व्हिज्युअल्स द्वारे प्रेक्षकांना नक्कीच आकर्षित करेल.

      या मालिकेतील एक उठून दिसणारा विशेष म्हणजे बारीक कलाकुसर केलेले पोशाख. या पोषाखांसाठी अजिंठा आणि वेरूळच्या (इलोरा) लेण्यांमधून प्रेरणा घेण्यात आली आहे. प्राचीन भारतीय संस्कृती आणि त्या काळाची भव्यता ध्यानात घेऊन प्रत्येक पात्राची वेशभूषा डिझाईन केली आहे. या पोषाखांवर बारीक डिझाईन, उत्कृष्ट भरतकाम असून विस्तृत रंग पटाचा उपयोग केला आहे, ज्यामधून या लेण्यांमधील भित्तिचित्रे (म्यूरल्स) आणि शिल्पकलेचे कलात्मक सौंदर्य दिसते. हे कालातीत सौंदर्य पोषाखांमध्ये आणल्यामुळे ‘वीर हनुमान’ ही मालिका खूप नेत्रसुखद तर होतेच, पण ती खऱ्याखुऱ्या नेत्रदीपक पद्धतीने समृद्ध भारतीय संस्कृतीचा वारसा जपते.

      या मालिकेतील व्हिज्युअल आकर्षणाविषयी बोलताना कॉस्च्युम डिझाईनर शिवप्रिया सेन म्हणते, “अजिंठा आणि वेरूळच्या अद्भुत लेण्यांमधून प्रेरणा घेऊन बनवलेला प्रत्येक पोशाख म्हणजे प्राचीन काळाच्या भव्यतेचे प्रतिबिंब आहे. आमचे ध्येय होते की असा पोशाख बनवायचा, जो केवळ दिसायला अप्रतिम नसेल, तर ऐतिहासिक अस्सलता देखील त्यात असेल. अंजनीच्या पोशाखात अस्सल कांजीवरम साड्या आहेत, ज्या चेन्नईच्या प्युअर साऊथ सिल्कमधून तयार केल्या आहेत, तर केसरीच्या मुकुटात भारतातील प्राचीन पर्वत आणि प्रदेश यांचे प्रतिबिंब दिसते. आम्हाला आशा आहे की, प्रत्येक लुकचा प्रेक्षकांवर वेगळा, दीर्घ प्रभाव पडेल आणि हे पोशाख भारताच्या गौरवशाली भूतकाळाचे कालातीत सौंदर्य साजरे करतील.”

       ‘वीर हनुमान’ मालिकेत अंजनीची भूमिका करणारी सायली साळुंखे म्हणते, “अंजनीची भूमिका साकारणे हा खूप समृद्ध करणारा अनुभव असणार आहे आणि या मालिकेचा एक सुंदर पैलू म्हणजे त्यात वापरण्यात आलेले उत्कृष्ट पोशाख. अजिंठा आणि वेरूळच्या लेण्यांमधील कलात्मक भव्यतेची प्रेरणा मालिकेतील पत्रांच्या पोशाखांत आहे. त्यामधून त्या काळातील समृद्ध संस्कृती दिसते. जांभळ्या आणि लाल रंगाच्या गडद छटा आणि त्यावर केलेले विविधरंगी बारीक वेलबुट्ट्यांचे भरतकाम यामधून अंजनीचे दिव्यत्व आणि तिचा राजेशाही थाट दिसून येतो. सुंदर पद्धतीने डिझाईन केलेले हे पोशाख परिधान केल्यानंतर त्या पात्राला खुलवण्याचे काम मी अधिक चांगल्या पद्धतीने करू शकते.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महाराष्ट्रात डिजिटल मीडियाला शासनाच्या जाहिराती मिळणार

महाराष्ट्रात डिजिटल मीडियाला शासनाच्या जाहिराती मिळणार मुंबई:-:-डिजिटल मीडियावर काम करणाऱ्…