Home मनोरंजन बी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विद्यापीठात ३ फेब्रुवारीला शिल्पकला कार्यशाळा

बी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विद्यापीठात ३ फेब्रुवारीला शिल्पकला कार्यशाळा

2 second read
0
0
16

no images were found

बी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त

विद्यापीठात ३ फेब्रुवारीला शिल्पकला कार्यशाळा

कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिल्पमहर्षी शिल्पकार बी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवाजी विद्यापीठात येत्या सोमवारी (दि. ३ फेब्रुवारी) शिल्पकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवाजी विद्यापीठाचा संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग आणि शिल्पसम्राट कला स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. शिल्पकार बी.आर. खेडकर यांच्या कलेच्या स्मृती सर्वांपर्यंत पोहोचाव्यात आणि नवशिल्पकार व कलाकारांना प्रेरणा मिळावी, या हेतूने ‘शिल्पकला कार्यशाळा-२०२५’ आयोजित केली आहे. कार्यशाळेत बी.आर. खेडकर यांच्या कन्या शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के आणि शिल्पकार संजीव संकपाळ हे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणार आहेत. ३ फेब्रुवारीला सकाळी १० ते ४ या वेळेत विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रासमोरील उद्यानात कार्यशाळा होईल. कार्यशाळेतील उत्तम कलाकृतींना सन्मानचिन्हे आणि अनुक्रमे रु. २०००, रु. १००० आणि रु. ५०० रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. इच्छुकांनी १ फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी ९०४९६४४४२३ आणि ९४२२४१६१७५ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…