
no images were found
गेमोजी फूड मॉल आबालवृद्धांचे मनोरंजन करेल-निवेदिता माने
कोल्हापूर,.(प्रतिनिधी):– गेमोजी फूड मॉल आबालवृद्धांचे मनोरंजन करण्याबरोबर जिभेचे चोचले पुरवून खवय्यांना तृप्त करेल, असा आशावाद माजी खासदार डॉ. निवेदिता माने यांनी व्यक्त केला.
सांगली-कोल्हापूर रस्त्यावर रेल्वे स्टेशन जयसिंगपूरनजीक सुरू करण्यात आलेल्या गेमोजी फूड मॉलचे उदघाटन श्रीमती माने यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
देवेंद्र यांच्या स्वभावानुसार ग्राहक हित प्राधान्याने समोर ठेवून दीड एकरात उभारलेल्या गेमोजी फूड मॉलमध्ये सेलेब्रिटी रेस्टो, फन झोन आणि उत्सव लॉन असे तीन विभाग आहेत. याचबरोबर लहान मुलांसाठी बगीचाही आहे. येथे तुम्हाला चहा, मॉकटेल, दहीवडा, महाराष्ट्रीयन स्नॅक, आईस्क्रीम, चायनीज, पिझ्झा बर्गर, सँडवीच आणि बरेच काही खाण्याचे पदार्थ मिळतील. फन झोनमध्ये विविध असे २० गेम उपलब्ध आहेत. उत्सव लॉनमध्ये बर्थ डे पार्टी, किटी पार्टी, कॉर्पोरेट मीटिंग, गॅदरिंग, प्रॉडक्ट लॉचिंग, अशा विविध प्रकारच्या बैठकांचे आयोजन करता येईल.
देवेंद्र चौगुले म्हणाले, नेहमीच आपल्या मायबाप रसिक प्रेक्षकांसाठी उच्च दर्जाची चित्रपटाची निर्मिती असो वा वॉटर पार्कच्या माध्यमातून तेथे येणाऱ्या ग्राहकांचे समाधान हाच आपला नफा मानून समाजाप्रती, समाजासाठी नेहमीच वेगळे देण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून गेमोजी फूड मॉलच्या माध्यमातून ग्राहकांच्या जिभेचे चोचले पुरविणार आहोत. त्याबरोबरच लहान मुलांचे मनोरंजनासाठी विविध प्रकार आहेत. प्रशस्त पार्किंग, एक्झिक्युटिव्ह वॉशरूम असणारे गेमोजी फूड मॉल सर्वांना पसंत पडेल, असा विश्वासही श्री. चौगले यांनी व्यक्त केला.
यावेळी सौ. कविता चौगुले, डॉ. सौ. अंजली पाटील, नंदिनी चौगुले, मालती चौगुले, शशिकला वडगावे, श्रीमती सुशीला खोत, सौ. स्नेहा खोत, सुब्बू, नासिर अत्तार यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. अनिता यांनी सूत्रसंचालन केले. शीतल खोत यांनी आभार मानले