Home सामाजिक जिल्ह्यातील 42 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 5 हजार 784 क्युसेक विसर्ग

जिल्ह्यातील 42 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 5 हजार 784 क्युसेक विसर्ग

18 second read
0
0
53

no images were found

जिल्ह्यातील 42 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 5 हजार 784 क्युसेक विसर्ग

 

 कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.23 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक 4,5 व 6  खुले असून सध्या धरणातून 5 हजार 784 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

पंचगंगा नदीवरील-शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली, गारगोटी, म्हसवे व शेणगाव, कासारी नदीवरील – यवलूज, कांटे, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण व वालोली, भोगावती नदीवरील- हळदी,राशिवडे, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगाव, दुधगंगा नदीवरील -दत्तवाड, सुळकुड व सिध्दनेर्ली, तुळशी नदीवरील- बीड, वारणा नदीवरील – खोची, कोडोली, शिगाव, चावरे, तांदूळवाडी, चिंचोली व माणगाव, हिरण्यकेशी नदीवरील- निलजी व ऐनापूर, ताम्रपर्णी नदीवरील-कुर्तनवाडी व चंदगड असे एकूण 42 बंधारे पाण्याखाली आहेत.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 8.23 टीएमसी, तुळशी 3.46 टीएमसी, वारणा 33.27 टीएमसी, दूधगंगा 23.91 टीएमसी, कासारी 2.74 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.71 टीएमसी, पाटगाव 3.72 टीएमसी, चिकोत्रा 1.52 टीएमसी, चित्री 1.89 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.24 टीएमसी, सर्फनाला 0.48 व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

आज सकाळी 7 च्या अहवालानुसार बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 33.9 फूट, सुर्वे 32.1 फूट, रुई 61.6 फूट, इचलकरंजी 58 फूट, तेरवाड 51 फूट, शिरोळ 46 फूट, नृसिंहवाडी 45 फूट, राजापूर 35.5 फूट तर नजीकच्या सांगली  22.9 फूट व अंकली 26.10 फूट अशी आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…