Home शैक्षणिक शिवाजी विद्यापीठाच्या ‘शिव वाणी’ कम्युनिटी रेडिओचे आज लोकार्पण

शिवाजी विद्यापीठाच्या ‘शिव वाणी’ कम्युनिटी रेडिओचे आज लोकार्पण

2 second read
0
0
73

no images were found

शिवाजी विद्यापीठाच्या ‘शिव वाणी’ कम्युनिटी रेडिओचे आज लोकार्पण

 
कोल्हापूर ( प्रतिनिधी):शिवाजी विद्यापीठाच्या शिव वाणी या कम्युनिटी रेडिओचे लोकार्पण कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते गुरुवार दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे. पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या इमारतीमध्ये सकाळी साडेनऊ वाजता हा समारंभ होणार आहे. 
शिवाजी विद्यापीठाचा कम्युनिटी रेडिओ ऐकण्यासाठी 89.6 ही फ्रिक्वेन्सी ट्यून करू शकता. ज्ञान, माहिती, लोकसहभाग आणि मनोरंजन यावर आधारित शिवाजी विद्यापीठ या रेडिओच्या माध्यमातून समुदायाच्या संपर्कात राहणार आहे. पहिल्या टप्प्यात सकाळी आठ ते नऊ आणि सायंकाळी सहा ते सात या वेळेत रेडिओचे प्रसारण होणार आहे. नंतर टप्प्याटप्प्याने हा कालावधी वाढवण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार समुदायाचा सहभागही कम्युनिटी रेडिओमध्ये असणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासातील हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम असून  विद्यापीठातील शिक्षण आणि संशोधन कार्याचा कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून विस्तार होत आहे, अशी प्रतिक्रिया कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली. कम्युनिटी रेडिओच्या लोकार्पण समारंभाला प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती कम्युनिटी रेडिओचे नोडलऑफिसर डॉ. शिवाजी जाधव यांनी दिली.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…